वॉशिंग्टन : गेल्या दोन दिवसांत टेक्सास प्रांतात आलेल्या भयंकर वादळाला राष्ट्रपती बराक ओबामा यांनी राष्ट्रीय संकट म्हणून जाहीर केले आहे. या वादळाने २१ जणांचे प्राण घेतले व नद्यांना फार मोठे पूर आले. वादळानंतर काही भागात १७.८ सेंटिमीटर पाऊस कोसळला.७० परगणे संकटग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. पावसात अडकलेल्या लोकांना पिण्याचे पाणी व अन्न पुरविण्यात आले. अवकाळी पावसामुळे पूर आल्याचे राष्ट्रीय हवामान खात्याने सांगितले. (वृत्तसंस्था)
टेक्सास प्रांतातील वादळ राष्ट्रीय संकट जाहीर
By admin | Updated: May 30, 2015 23:39 IST