शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
2
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
3
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
4
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
5
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
6
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
7
हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या?
8
हेरगिरी, ‘हनिट्रॅप’ आणि लाखोंची हकालपट्टी! हेरगिरीच्या संशयामुळे अफगाण निर्वासितांचे हाल
9
कोल्हापुरी चप्पल ‘चोरण्याची’ हिंमतच होऊ नये म्हणून...
10
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
11
नोकरीसाठी अडचण नको म्हणून चक्क पोटच्या मुलीलाच विकले
12
हवाई सुंदरीवर अत्याचार; क्रू मेंबरला अटक, मीरा रोड येथील घटना
13
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
14
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
15
संपादकीय : घोषणा नको, कृती हवी! दहशतवादाविरोधात भारताला आत्मनिर्भर व्हावे लागेल
16
इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
17
तरुणांना भाषणबाजी नको, रोजगार हवा! राहुल गांधी यांनी व्यक्त केली चिंता
18
कृषिमंत्री कोकाटेंच्या मोबाइलवर पत्ते; विधानपरिषदेतील व्हिडीओने खळबळ
19
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
20
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 

"हे खूप घृणास्पद, मी आता सहन करू शकत नाही"; ट्रम्प यांच्या निर्णयावर इलॉन मस्क संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 09:16 IST

Elon Musk on Tax and Spending bill: डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर ट्रम्प प्रशासनाच्या 'डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट इफिशियन्सी'म्हणजे ...

Elon Musk on Tax and Spending bill: डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर ट्रम्प प्रशासनाच्या 'डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट इफिशियन्सी'म्हणजे खर्च कपात विभागात टेस्लाचे मालक इलॉन मस्क दाखल झाले होते. मात्र एका विधेयकावरुन केलेल्या टीकेनंतर मस्क नुकतेच ट्रम्प सरकारमधून बाहेर पडले. त्यानंतर आता इलॉन मस्क यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका मोठ्या कर आणि खर्च विधेयकावर जोरदार टीका केली आहे. हे विधेयक खूप घृणास्पद असल्याचे मस्क यांनी म्हटलं. मी आता हे सहन करु शकत नाही असेही मस्क म्हणाले. त्यामुळे आता ट्रम्प यांच्या विजयात मोठा वाटा असणारे इलॉन मस्क हे राष्ट्राध्यक्षांच्या विरोधात जात असल्याचे पाहायला मिळत आहे.

अवघ्या चार महिन्यांत सरकारमधून इलॉन मस्क बाहेर पडले. ट्रम्प यांच्या अर्थसंकल्पाबद्दल निराशा व्यक्त करत मस्क सरकारमधून बाहेर पडले होते. अर्थसंकल्पामध्ये मल्टी ट्रिलियन डॉलरच्या कर सवलती आणि संरक्षण खर्च वाढवण्याचे प्रस्ताव होते. त्यानंतर आता मस्क यांनी पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी केलेल्या अर्थसंकल्पीय विधेयकावर हल्लाबोल केला आहे. मस्क यांनी वन बिग ब्युटीफुल बिल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कायद्यावरुन जोरदार टीका केली आहे. ट्रम्प यांनी सिनेट रिपब्लिकनना हे विधेयक मंजूर करण्याचे आवाहन केल्यानंतर मस्क यांनी भाष्य केलं.

"मला माफ करा पण मी आता ते सहन करू शकत नाही. काँग्रेसमधील हे विधेयक प्रचंड, अपमानजनक आणि पूर्णपणे घृणास्पद आहे. ज्यांनी याला मतदान केले त्यांना लाज वाटली पाहिजे. तुम्हाला माहिती आहे की तुम्ही चूक केली आहे," अशी एक्स पोस्ट मस्क यांनी केली. 

डोनाल्ड ट्रम्प यांनी नियुक्ती केल्यानंतर मस्क खर्च कमी करण्यासाठी आणि कार्यक्षमता सुधारण्यासाठी डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट इफिशियन्सीमधून प्रयत्न करत  होते. मस्क यांनी अनेक संघीय यंत्रणांमध्ये बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले. मात्र तरी त्यांना अपेक्षित असलेली मोठी बचत झाली नाही. त्यानंतर डॉजमध्ये विशेष सरकारी कर्मचारी म्हणून त्यांची औपचारिक भूमिका गेल्या आठवड्यात संपली. 

दुसरीकडे, व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी मस्क यांच्या टीकेवर प्रत्युतर देताना, "या विधेयकाबद्दल ते काय विचार करतात हे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना आधीच माहित होते, पण मस्क यांच्या या निर्यणामुळे त्यांचे (ट्रम्प) मत बदलणार नाही. हे एक मोठे विधेयक आहे आणि राष्ट्राध्यक्ष त्याच्या बाजूने उभे आहेत," असं म्हटलं. 

टॅग्स :elon muskएलन रीव्ह मस्कDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिका