शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

 या झाडाला घाबरले होते इसिसचे दहशतवादी, भीतीने कापले झाड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2017 20:50 IST

आपल्या क्रूर कारवायांनी जगभरात दहशत पसरवणाऱ्या इसिसच्या दहशतवाद्यांनी इराक आणि सीरियामध्ये हिंसाचार माजवला आहे. या दहशतवाद्यांचा बीमोड करण्यासाठी स्थानिक सुरक्षा यंत्रणा आणि अमेरिकेसह इतर देशांकडून मोहीम सुरू आहे.

दमिश्क, दि. 16 - आपल्या क्रूर कारवायांनी जगभरात दहशत पसरवणाऱ्या इसिसच्या दहशतवाद्यांनी इराक आणि सीरियामध्ये हिंसाचार माजवला आहे. या दहशतवाद्यांचा बीमोड करण्यासाठी स्थानिक सुरक्षा यंत्रणा आणि अमेरिकेसह इतर देशांकडून मोहीम सुरू आहे. याचदरम्यान इसिसचे क्रूर दहशतवादी एका झाडाला घाबरत असल्याची माहिती समोर आली आहे. या भीतीपोटी सदर दहशतवाद्यांनी हे झाड मुळापासून कापून टाकले.  यासंदर्भातील छायाचित्रे प्रकाशित झाली आहे. त्यामध्ये इसिसचे दहशतवादी एक झाड कापताना दिसत आहे. या झाडाचा आकार पाहिल्यानंतर सहर झाडाची लोकांकडून पूजा करण्यात येऊ शकते, अशी भीती इसिसच्या दहशतवाद्यांना वाटत होती. दरम्यान, इसिसशी संबंधित असलेल्या खालिद बिन वालिद संघटनेच्या दहशतवाद्यांनी हे झाड तोडून टाकले. प्रसारित झालेल्या छायाचित्रांमध्ये काही दहशतवादी हे झाड मुळापासून तोडून टाकताना दिसत आहेत. डेली मेलने यासंदर्भातील वृत्त प्रकाशित केले आहे. या झाडामुळे बहुदेवता परंपरेला प्रोत्साहन मिळेल, अशी भीती या संघटनेला वाटत होती, असे होणे इस्लामच्या विचारांच्या विरोधात असल्याने त्यांनी हे कृत्य केले, असे या वृत्तात म्हटले आहे.  इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी याआधीही इस्लामिक परंपरेच्या विरोधी ठरवून इराक आणि सीरियामधील अनेक पुरातन वास्तू पाडल्या आहेत.  तसेच या संघटनेच्या क्रूर नियमांनुसार अल्ला वगळता अन्य कुणाची पूजा करणे हे इस्लामविरोधी असून, त्याची शिक्षा मृत्युदंड ही निश्चित करण्यात आली आहे.  

इसिसनं याआधी उडवली मोसुलमधील प्रसिद्ध नूरी मस्जिददहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटनं (ISIS) मोसुलमधील प्रसिद्ध अल-नूरी मस्जिद गेल्या महिन्यात स्फोट घडवून उडवली होती.  ISIS नेता अबू बकर अल बगदादी 2014 मध्ये या मस्जिदच्या माध्यमातून पहिल्यांदा लोकांसमोर आला होता व त्यानं आपल्या खिलाफतची घोषणा केली होती.  दरम्यान, ही मस्जिद अमेरिकेच्या एका लढाऊ विमानाच्या हल्ल्यात नष्ट झाली, असा दावा इसिसनं असा दावा केला होता. तर दुसरीकडे अमेरिकेनं हा दावा फेटाळून लावला होता. काय आहे अल-नूरी मस्जिदचे वैशिष्ट्य ?- इसिस आणि त्याविरोधात लढणारे पक्ष  यासाठी मस्जिदचे विशेष असे महत्त्व आहे - इसिस नेता अबू बकल अल बगदादीनं जुलै 2014 मध्ये येथे एक सभा घेऊन नवीन इस्लामिक राज्य स्थापित करण्याची घोषणा केली होती- या घोषणेच्या आठ आठवड्यांनंतर मोसुल शहरावर इसिसनं कब्जा केला होता- 1172 मध्ये मोसुल आणि अलेपोवर शासन करणारा नूर अल दीन महमूद जांगीनं ही मस्जिद निर्माण करण्यासाठी आदेश दिला होता. - नूर अल दीन महमूद जांगीच्या नावावरुनच मस्जिदचे नाव ठेवण्यात आले होते