दहशतवादी हाफिज सईदचा प्लॅन, राजकारणात उतरण्याची तयारी 

By sagar.sirsat | Published: August 4, 2017 07:04 AM2017-08-04T07:04:55+5:302017-08-04T07:10:33+5:30

पाकिस्तानच्या राजकारणात मोठी उलथापालथ होत असताना मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईद राजकारणात उतरण्याच्या तयारीत, पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाकडे केला अर्ज

Terrorist Hafiz Saeed planning to register political party | दहशतवादी हाफिज सईदचा प्लॅन, राजकारणात उतरण्याची तयारी 

दहशतवादी हाफिज सईदचा प्लॅन, राजकारणात उतरण्याची तयारी 

Next
ठळक मुद्देराजकारणात उतरण्यासाठी जमात-उद-दावा या संघटनेचं नाव बदलून  ‘मिल्ली मुस्लिम लीग पाकिस्तान’ या नावाने राजकीय पक्ष पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाकडे अर्ज दाखल केला आहेराजकारणात उतरण्याची हीच योग्य वेळ असल्याचं ओळखून  सध्याच्या परिस्थितीचा फायदा घेण्याची हाफिज सईदची योजनाराजकारणाच्या माध्यमातून पाकिस्तानात आपले पाय आणखी घट्ट रोवण्याचा त्याचा विचार

इस्लामाबाद, दि. 4 - पाकिस्तानच्या राजकारणात मोठी उलथापालथ होत असताना मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि दहशतवादी संघटना जमात-उद-दावाचा प्रमुख हाफिज सईद राजकारणात उतरण्याच्या तयारीत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून तो पाकिस्तानात नजरकैदेत आहे. राजकारणात उतरण्यासाठी जमात-उद-दावा या संघटनेचं नाव बदलून  ‘मिल्ली मुस्लिम लीग पाकिस्तान’ या नावाने राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळावी यासाठी त्याने पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाकडे अर्ज दाखल केला आहे.

गेल्या सहा महिन्यांपासून सईद पाकिस्तानात नजरकैदेत आहे. या दरम्यान पाकिस्तानात मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळाली. पनामा प्रकरणात दोषी आढळल्याने शरीफ यांची पंतप्रधानपदावरून गच्छंती झाली आहे. तर दुसरीकडे विरोधीपक्षातील  तहरीक-ए-इन्साफचे नेते आणि इम्रान खानवर त्यांच्याच पक्षातील महिला नेत्याने अश्लिल मेसेज पाठवल्याचा आरोप ठेवत पक्षाला सोडचिट्ठी दिली आहे. 

 त्यामुळे राजकारणात उतरण्याची हीच योग्य वेळ असल्याचं ओळखून  सध्याच्या परिस्थितीचा फायदा घेण्याची हाफिज सईदची योजना आहे. पाकिस्तानचं लष्कर आणि आयएसआय सोबतही सईदचे संबंध चांगले आहेत. याचा फायदा उचलण्याचा हाफिज सईदचा विचार आहे. पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने हिरवा कंदील दाखवल्यास या दहशतवाद्याचा राजकारणात उतरण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. राजकारणाच्या माध्यमातून पाकिस्तानात आपले पाय आणखी घट्ट रोवण्याचा त्याचा विचार आहे असं तज्ञांचं म्हणणं आहे. 

हाफिज सईद गेल्या 6 महिन्यांपासून नजरकैदेत आहे. जमात-उद-दावावर कारवाई न केल्यास पाकिस्तानवर निर्बंध लादण्यात येतील असा इशारा अमेरिकेने दिल्यानंतर हाफिजला नजरकैदेत ठेवण्यात आले. मुंबई 26/11 दहशतवादी हल्ल्याचा हाफिज सईद हा मास्टरमाईंड आहे आणि त्याच्यावर कारवाई करण्याची भारत सातत्याने मागणी करत आहे. 
 

Web Title: Terrorist Hafiz Saeed planning to register political party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.