शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवादी हाफिझ सईदने पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांवर ठोकला 10 कोटींच्या मानहानीचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2017 08:59 IST

26/11 ला झालेल्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या मास्टरमाइंड कुख्यात दहशतवादी हाफिझ सईद याने पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री ख्वाजा आसिफ यांच्यावर 10 कोटींच्या मानहानीचा दावा ठोकला आहे.

लाहोर - 26/11 ला झालेल्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या मास्टरमाइंड कुख्यात दहशतवादी हाफिझ सईद याने पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री ख्वाजा आसिफ यांच्यावर 10 कोटींच्या मानहानीचा दावा ठोकला आहे. ख्वाजा आसिफ यांनी  हाफिझ सईदचा उल्लेख अमेरिकेचा डार्लिंग असा केला होता, त्यामुळे संतप्त झालेल्या सईदने आसिफ यांच्या विरोधात हा दावा ठोकला आहे.  न्यूयॉर्क येथील एशिया सोसायटीच्या कार्यक्रमात बोलताना ख्वाजा आसिफ यांनी हाफिझ सईदला अमेरिकेचा एकेकाळचा डार्लिंग म्हटले होते.  अमेरिका आज ज्या दहशतवादी संघटनांवर कारवाई करण्याची मागणी करत आहे. त्यांच्याबरोबर 20-25 वर्षांपूर्वी डार्लिंगसारखा व्यवहार करत होती, असा आरोप त्यांनी केला होता.  मुंबई 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदचा उल्लेख करताना ख्वाजा आसिफ यांनी सांगितले की, 'सध्या तो नजरकैदेत आहेत. मात्र आम्हाला अजून कडक कारवाई केली पाहिजे हे मान्य करायला हवे. पाकिस्तानात असे अनेक लोक आहेत जे पाकिस्तानाच अडचणीत असताना डोकेदुखी ठरु शकतात. या मताशी मी सहमत आहे'.  यावेळी ख्वाजा आसिफ यांनी पाकिस्तानला दहशतवादाला संपवण्यासाठी अजून प्रयत्न करण्याची गरज असल्याचंही मान्य केले. मात्र त्यासाठी अजून वेळ हवा असल्याचे त्यांनी सांगितले. 'हाफिज सईद, लष्कर-ए-तोयबा आमच्यासाठी डोकेदुखी आहे, हे मला मान्य आहे. पण त्यांच्यापासून सुटका करुन घेण्यासाठी आम्हाला वेळ हवा आहे. त्यांचा सामना करण्यासाठी सध्या आमच्याकडे ताकद नाही', असे ख्वाजा आसिफ यांनी सांगितले.  ख्वाजा आसिफ यांनी यावेळी हाफिज सईद आणि इतर दहशतवादी संघटना मोठ्या होण्यामागे अमेरिकाही तितकीच जबाबदार असल्याचं सांगितले. 'हाफिज सईदसाठी उगाच आम्हाला दोष देऊ नका. 20 वर्षांपासून त्यांना आपल्या प्रिय लोकांप्रमाणे वागवत आहेत. व्हाईट हाऊसमध्ये त्यांच्यासोबत बसून तुम्ही खाणे पिणं केले, आणि आता पाकिस्तानला दोष देता', असे ख्वाजा आसिफ बोलले आहेत. यावेळी अफगाणिस्तानमधील अमेरिकेच्या प्रॉक्सी वॉरला समर्थन देणं पाकिस्तानला खूपच महागात पडलं असल्याचे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :hafiz saedहाफीज सईदPakistanपाकिस्तानTerrorismदहशतवाद