शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

बालाकोटमध्ये दहशतवादी तळ पुन्हा सक्रिय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2019 06:55 IST

सध्या बालाकोटमध्ये ४० दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे

नवी दिल्ली : सात महिन्यांपूर्वी भारतीय हवाई दलाच्या विमानांनी बॉम्बहल्ल्यांद्वारे उद्ध्वस्त केलेले पाकिस्तानच्या बालाकोटमधील जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी प्रशिक्षण तळ आता पुन्हा सक्रिय करण्यात आले आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करून हल्ले चढविण्यासाठी सध्या बालाकोटमध्ये ४० दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्यामध्ये ४० सीआरपीएफ जवान शहीद झाले होते. त्यावर जवाबी कारवाई म्हणून भारताने बालाकोटचे दहशतवादी तळ नष्ट केले होते. मात्र, काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम भारताने रद्द केल्यानंतर अंगाचा तिळपापड झालेल्या पाकिस्तानच्या आशीर्वादाने जैश-ए-मोहम्मदने आपले हे तळ पुन्हा सुरू केले आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या सोमवारी होणाऱ्या आमसभेत काश्मीरच्या मुद्यावर पुन्हा आकांडतांडव करण्याचाही पाकिस्तानचा मनसुबा आहे.पुलवामा घटना व भारताने केलेल्या प्रतिहल्ल्यानंतर काही काळ शांत बसलेले पाकिस्तानातील दहशतवादी गट आता पुन्हा सक्रिय झाले आहेत. ३७० कलम रद्द करण्याच्या निर्णयानंतर जैश-ए-मोहम्मदचा कमांडर मुफ्ती अब्दुल रौफ असगरने पाकिस्तानच्या इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्सच्या (आयएसआय) अधिकाऱ्यांची भेट घेतली. भारताला कसे प्रत्युत्तर द्यायचे, याबाबत त्यांच्यात त्यावेळी चर्चा झाली.

टॅग्स :terroristदहशतवादीIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईक