शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
4
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
5
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
6
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
7
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल
8
वर्क फ्रॉम होम कल्चर संपतंय का? 'या' दिग्गज टेक कंपनीनंही आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावलं
9
आयफोन १७ सिरीजमध्ये 'या' गोष्टी मिळणार नाहीत; खरेदी करत असाल तर...
10
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
11
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
12
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
13
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
14
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
15
महाराष्ट्रात ७०० आरटीओ अधिकाऱ्यांची कमतरता, प्रशासनावर ताण
16
"त्याला उचकी आली आणि...", 'अशी ही बनवा बनवी'मधील शंतनूचं असं झालं निधन, पत्नीचा खुलासा
17
वाद-प्रतिवाद सुरू असलेल्या भारताला आज स्वीकारमंत्र अंगीकारण्याची गरज -मोरारीबापू
18
Prithvi Shaw: सपना गिल विनयभंग प्रकरणात न्यायालयाने पृथ्वी शॉला ठोठावला १०० रुपयांचा दंड!
19
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
20
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख

अमेरिकेत दहशतवादी हल्ला; ISIS चा झेंडा लावून गोळीबार करत गर्दीत घुसवला ट्रक, १५ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 08:03 IST

अमेरिकेत नवीन वर्ष साजरे करणाऱ्या लोकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १५ जण ठार झाले आहेत.

New Orleans Attack : अमेरिकेत नववर्षाच्या पहिल्याच दिवशी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १५ जणांचा मृत्यू झाला. न्यू ऑर्लिन्स शहरात बुधवारी पहाटे शमसुद्दीन जब्बार नावाच्या हल्लेखोराने नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी जमलेल्या जमावाला ट्रकने चिरडले, ज्यामध्ये आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला आहे. यावेळी त्यांनी पोलीस आणि तिथल्या लोकांवर गोळ्हीया झाडल्या. यानंतर पोलिसांनी त्याला ठार केले. एफबीआय या घटनेची दहशतवादी घटना म्हणून चौकशी करत आहेत. जास्तीत जास्त लोकांना ट्रकने चिरडायचे होते. लोकांना मारण्याचा आणि इजा करण्याचा त्याचा हेतू होता, असं पोलिसांनी सांगितले.

नवीन वर्षाच्या दिवशी सकाळी अमेरिकेतील न्यू ऑर्लीन्सच्या फ्रेंच क्वार्टरमध्ये बोर्बन स्ट्रीटवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १५ जणांना आपला जीव गमवावा लागला असून ३० जण जखमी झाले आहेत. शमसुद्दीन जब्बार हा अमेरिकन नागरिक असून त्याने दीर्घकाळ लष्करात सेवा बजावली होती. यामागे इसिसचा हात असू शकतो, असे  एफबीआयला वाटते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचीही या हल्ल्यावर शोक व्यक्त केला आहे.

४२ वर्षीय शमसुद्दीन जब्बारने ज्या ट्रकने जमावाला चिरडले, त्या ट्रकला इसिस या दहशतवादी संघटनेचा झेंडा लावलेला होता. या घटनेत जब्बारसोबत अनेक लोक होते, त्यामुळे आम्हाला जनतेच्या मदतीची गरज आहे. गेल्या ७२ तासांत शमसुद्दीन जब्बार यांच्याशी कोणी बोलले आहे का, याची आम्ही चौकशी करत आहोत, असं तपास अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. स्थानिक माध्यमांच्या म्हणण्यानुसार, बोर्बन स्ट्रीट दहशतवादी हल्ल्याशी संबंधित हल्लेखोराच्या भाड्याच्या घरात बॉम्ब बनवण्याचे साहित्य सापडले.

जब्बारने जमावात घुसलेल्या ट्रकचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये ३ पुरुष आणि १ महिला वाहनात आईईडी टाकत आहेत. याशिवाय ट्रकवर इसिसचा झेंडा सापडल्यानेही तो या संघटनेशी संबंधित असल्याचे म्हटलं जात आहे. एफबीआयच्या म्हणण्यानुसार, जब्बार मुळचा टेक्सासमधला आहे. जॉर्जिया स्टेट युनिव्हर्सिटीमधून बॅचलरची पदवी पूर्ण केल्यानंतर, त्याने बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये काम केले. येथे तो बिझनेस डेव्हलपर आणि डेटा इंजिनीअर म्हणून काम करत होता. जिथे त्यांचा वार्षिक पगार १,२०,००० डॉलर्स म्हणजेच सुमारे एक कोटी रुपये होता. त्यांनी यूएस आर्मीमध्ये एक १० वर्षे एचआर स्पेशालिस्ट आणि आयटी स्पेशालिस्ट म्हणून काम केले होते.

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरून लांब पल्ल्याची बंदूक जप्त केली. हल्ल्याच्या वेळी हल्लेखोराने अंगावर जॅकेट घातले होते. हल्ल्यासाठी वापरलेला ट्रक भाड्याने घेतला होता. ट्रकमध्ये एआर स्टाईल रायफल, पिस्तूल आणि काही बॉम्ब सापडले आहेत. तपास करणाऱ्यांचे म्हणणे आहे की त्यांना घटनास्थळी एक आयईडी सापडला, ज्याचा स्फोट झाला नाही.

 

टॅग्स :AmericaअमेरिकाTerror Attackदहशतवादी हल्ला