शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

कराची शेअर बाजारावर अतिरेकी हल्ला; चार हल्लेखोरांसह ११ जण ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2020 03:37 IST

प्रयत्न विफल : मृतांत चार सुरक्षारक्षक, एक पोलीस उपनिरीक्षक

कराची : कराची या पाकिस्तानच्या आर्थिक राजधानीच्या मध्य वस्तीत असलेल्या ‘पाकिस्तान स्टॉक एक्स्चेंज’ या देशाातील सर्वात जुन्या शेअर बाजारावर दहशतवादी हल्ला करण्याचा प्रयत्न त्या इमारतीचे सुरक्षारक्षक व पोलिसांनी सोमवारी उधळून लावला. इमारतीत घुसू पाहणाऱ्या चारही सशस्त्र हल्लेखोरांना अवघ्या आठ मिनिटांत गारद केले गेले. या कारवाईत त्या इमारतीचे चार सुरक्षारक्षक, एक पोलीस उपनिरीक्षक आणि दोन नागरिकांनाही प्राण गमवावे लागले. तीन पोलिसांसह इतर सातजण जखमी झाले.

सकाळी १० च्या सुमारास चार सशस्त्र दहशतवादी पांढºया कॉरेला मोटारीतून इमारतीच्या प्रवेशद्वारापाशी दाखल झाले. या रायफलधारी हल्लेखोरांनी हातबॉम्ब फेकून आत घुसण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रवेशद्वारावरील सुरक्षारक्षकांनी त्यांना रोखले. तेथेच दोन्ही बाजूंकडून गोळीबार सुरु झाला. काही मिनिटांतच सिंध रेंजर्स या सशस्त्र पोलीस दलाचे जवान तेथे दाखल झाले. त्यांनी चारही हल्लेखोरांना काही मिनिटांतच ठार केले. तीन हल्लेखोर प्रवेशद्वारावर व एक जण काही पावले आत पार्किंग लॉटमध्ये मारला गेला.

कोणत्याही दहशतवादी संघटनेने संध्याकाळपर्यंत या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली नाही. पोलिसांनीही संशयित म्हणून कोणत्याही संघटनेचे नाव घेतले नाही. मात्र सिंध रेजर्सचे महासंचालक उमर अहमद बुखारी व पाकिस्तानचे एक कंद्रीय मंत्री फौवाद चौधरी यांनी या हल्ल्यामागे भारताच्या ‘रॉ’ या गुप्तहेर संघटनेचा हात असल्याचा आरोप केला. चारही हल्लेखोरांकडे एके-४७ रायफली, कित्येक डझन हातबॉम्ब व अनेक दिवस पुरतील एवढी अन्नपाकिटे होती. यावरून शेअर बाजाराच्या मुख्य ट्रेडिंग फ्लोरमध्ये शिरून मोठा रक्तपात करण्याचा त्यांचा इरादा होता, असे बुखारी म्हणाले. कामात व्यत्यय नाहीस्टॉक एक्स्चेंज इमारतीच्याच आवारात पाकिस्तानची सेंट्रल बँक, अन्य काही खासगी बँका व अनेक प्रमुख वित्तीय कंपन्यांची मुख्यालये असल्याने हा परिसर पाकिस्तानचे ‘वॉलस्ट्रीट’ म्हणून ओखळला जातो. कोरोनामुळे निर्बंध लागू असल्याने व दिवसाच्या कामाची सुरुवात असल्याने इमारतीत व आवारातही सुदैवाने फारशी गर्दी नव्हती. हल्ला प्रवेशव्दारावरच रोखला गेल्याने शेअर बाजाराच्या कामकाजात त्याने कोणताही व्यत्यय आला नाही. उलट दिवसभराच्या व्यवहारांनंतर बाजाराचा निर्देशांक वधारला.

टॅग्स :Terror Attackदहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तान