शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

अणुबॉम्बपेक्षाही भयंकर..! तुर्कस्तान, सीरियातील भूकंप बळींची संख्या १९ हजारांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2023 06:06 IST

बचाव कर्मचाऱ्यांनी कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्यातील जिवंत लोकांचा शोध सुरूच ठेवला असला तरी तीन दिवस उलटून गेल्यामुळे तसेच येथे कडाक्याची थंडी पडल्याने तासागणिक जिवंत लोक सापडण्याची आशा मावळत चालली आहे.

गाजियांटेप : अणुबॉम्ब कोसळावा आणि होत्याचे नव्हते व्हावे, अशी स्थिती आमची झाली होती... भूकंप महाभयंकर होता.. ढिगाऱ्याखालून निघालेल्यांपैकी काही जण थरथरत आपला अनुभव कथन करत होता. तुर्कस्तान व सीरियातीलभूकंप बळींची संख्या १९ हजारांहून अधिक झाल्याची माहिती तुर्कस्तानच्या आपत्ती व्यवस्थापन संस्थेने गुरुवारी दिली. 

ढिगाऱ्याखाली आणखी मृतदेह आढळून आल्यामुळे मृतांचा आकडा वाढला. दरम्यान, बचाव व मदत पथके ढिगाऱ्याखाली अडकलेल्या जिवंत लोकांना वाचविण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करत असून, आज आणखी काही जणांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यात यश आले. तथापि, जसजशी वेळ पुढे सरकत आहे तसतशी जिवंत लोक सापडण्याची आशा धूसर होत चालली आहे. 

एवढ्या इमारती का कोसळल्या? - इस्तांबून टेक्निकल युनिव्हर्सिटीतील प्रोफेसर ओकान तुयसुझ यांच्या मते, सोमवारचा प्रसंग महाभयंकर होता. पहिला भूकंपाची तीव्रता तर ५० लाख टन टीएनटी स्फोटकांच्या हादऱ्यापेक्षा मोठा होता. दुसरा ३५ लाख टन टीएनटीतून निर्माण होणाऱ्या ऊर्जेएवढा होता. अशा भीषण हादऱ्यांमध्ये इमारती टीकाव धरणे शक्यच नव्हते.

- तुर्कीतील सिव्हिल इंजिनिअर सिनान तुरक्कन यांच्या मते, भूकंपाचा हादरा भयंकर तर होताच, शिवाय तो पाठोपाठ होता. त्यामुळे पहिल्या हादऱ्यात जास्त इमारती कोसळल्या नाहीत; पण लगेच दुसरा हादरा बसल्याने इमारती कोलमडून जमीनदोस्त झाल्या.

जिवंत राहण्याची शक्यता किती?बचाव कर्मचाऱ्यांनी कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्यातील जिवंत लोकांचा शोध सुरूच ठेवला असला तरी तीन दिवस उलटून गेल्यामुळे तसेच येथे कडाक्याची थंडी पडल्याने तासागणिक जिवंत लोक सापडण्याची आशा मावळत चालली आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेले लोक वाचण्याच्या दृष्टीने भूकंपानंतरचे पहिले ७२ तास महत्त्वपूर्ण असतात, असे इंग्लंडमधील नॉटिंगहॅम ट्रेंट विद्यापीठाचे नैसर्गिक धोके तज्ज्ञ स्टीव्हन गोडबाय यांनी सांगितले. पहिल्या २४ तासांत जिवंत राहण्याचे सरासरी प्रमाण ७४ टक्के, ७२ तासांनंतर २२ टक्के आणि पाचव्या दिवशी सहा टक्के एवढे असते, असे ते म्हणाले. कोणत्या देशात किती बळी?- तुर्कस्तानच्या भूकंप व भूकंपोत्तर धक्क्यांमुळे सोमवारी पहाटे १६,१७० लोकांचा मृत्यू झाला तर ६० हजारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत.- दुसरीकडे, सीरियाचही ३,१६२ लोक मृत्युमुखी पडले असून, पाच हजारांहून अधिक लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. भूकंपामुळे जीवितहानीसह मालमत्तेची मोठी हानी झाल्याने लाखो लोक बेघर झाले आहेत. 

- ७००० इमारती एकट्या तुर्कीमध्ये काेसळल्या - २,००,००,००० इमारती तुर्कीमध्ये असून, भूकंपाची सातत्याने भीती असणाऱ्या क्षेत्रात १२ लाख इमारती भूकंपात कोसळू शकतात, अशा स्थितीत आहेत. 

टॅग्स :EarthquakeभूकंपSyriaसीरियाDeathमृत्यू