शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

मेक्सिकोमध्ये भयावह भूकंप, २५0 हून अधिक जण ठार : कोट्यवधींची आर्थिक हानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 04:12 IST

मेक्सिकोमध्ये मंगळवारी झालेल्या भयावह भूकंपाने २१ शाळकरी मुलांसह २५० हून अधिक जणांचे बळी घेतले असून, प्रचंड आर्थिक हानीही घडवून आणली आहे.

मेक्सिको सिटी : मेक्सिकोमध्ये मंगळवारी झालेल्या भयावह भूकंपाने २१ शाळकरी मुलांसह २५० हून अधिक जणांचे बळी घेतले असून, प्रचंड आर्थिक हानीही घडवून आणली आहे. या ७.१ तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपाच्या तडाख्याने अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या. इमारतींच्या ढिगाºयांखाली अनेक जण अडकून पडले आहेत.मेक्सिकोतील एन्रिक रेबासमेन प्राथमिक शाळेतील दृश्य हृदय गोठवणारे होते. या शाळेच्या इमारतीचे तीन मजले डोळ्यांच्या पापण्या लवण्याच्या हात भुईसपाट झाले. त्यात २१ विद्यार्थी मरण पावले. याशिवाय मेक्सिकोतील अनेक इमारती पत्त्याच्या बंगल्यासारख्या काही क्षणातच कोसळल्या. इमारतींच्या ढिगाºयाखाली अनेक जण अडकले असून, मदत व बचाव पथके ढिगारे उपसून त्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. भूकंपाची तीव्रता पाहता मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. मेक्सिको सिटीबरोबरच प्युएब्ला, मॉरेलॉस, मेक्सिकोस्टेट आणि गुएर्रेरो येथे जीवितहानी झाली. अचानक इमारती हादरू लागल्याने अनेकांनी जीव मुठीतधरून मोकळ्या सुरक्षित जागी धाव घेतली. (वृत्तसंस्था)>जगभरातून मदतमेक्सिको सिटीवर कोसळेल्या या भयंकर आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी जगभरातून मदतीसाठी हात पुढे आले असून, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, कॅनडाच्या पंतप्रधानांनी मदत देऊ करून संकटकाळात आम्ही तुमच्या पाठीशी असल्याचे सांगत मेक्सिको सिटीवासीयांना धीर दिला. भूकंपामुळे इमारती कोसळताना, आतच्या गॅस सिलिंडर्समुळे तसेच विजेच्या उपकरणांमुळे स्फोट झाले आणि कोसळणाºया इमारती जळतच खाली आल्या. त्या आगींमुळेही काही जण होरपळून मरण पावले. मेक्सिकोमध्ये १९८५ मध्ये याच दिवशी आलेल्या भयानक विध्वसंकारी भूकंप झाला होता. त्यावेळी १० हजार लोक मृत्युमुखी पडले होते. या विध्वंसक भूंकपाच्या आठवणी मेक्सिकोवासीयांच्या मनी कायम असताना मंगळवारी १९ सप्टेंबरच्या रात्री भूकंपाने मेक्सिको सिटी हादरली. मंगळवारच्या भूकंपाआधी १२ दिवसांपूर्वी दक्षिणेकडील दोन प्रांतांत आलेल्या भूकंपात १०० जण ठार, तर दोनशेहून अधिक जखमी झाले होते.