शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! राष्ट्रवादीतील पक्षप्रवेशाचा हायव्हॉल्टेज ड्रामा; "मला टॉर्चर केले गेले, अन्..."
2
महापुरुषांचा अपमान करणाऱ्या नेत्यांची यादीच वाचली; जितेंद्र आव्हाडांनी भाजपाला सुनावलं
3
"कंगनाकडे राणी लक्ष्मीबाईसारखे शौर्य आणि...", योगी आदित्यनाथांनी उधळली स्तुतीसुमने
4
"महात्मा गांधींबाबत माहित नाही, मग त्यांना राज्यघटनेबाबतही…’’, मल्लिकार्जुन खर्गेंचा नरेंद्र मोदींवर संताप
5
"हा उद्योग केल्यावर दोन दिवस झोप लागली नाही"; रक्ताचे नमुने बदलणाऱ्या डॉक्टरने दिली कबुली
6
सरकार स्थापन होताच 25 दिवस खास तरुणांसाठी! अखेरच्या रॅलीत काय-काय बोलले पंतप्रधान मोदी?
7
महाराष्ट्रात निकाल काय? Lokniti-CSDS च्या विश्लेषकांची भविष्यवाणी; महायुतीला धक्का
8
"नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा घालवली...", मनमोहन सिंग यांची पत्रातून टीका
9
दोन मुलांच्या मृत्यूची जबाबदारी ड्रायव्हरच घेईल; ब्रिजभूषण यांची उडवाउडवीची उत्तरे
10
जम्मूमध्ये पोलीस ठाण्यावर हल्ला; लष्कराच्या १६ जवानांवर गुन्हा दाखल
11
आरोग्य सांभाळा! 'या' लोकांसाठी AC ठरू शकतो घातक; फुफ्फुसांचं होईल मोठं नुकसान
12
आमचे येथे श्रीकृपेकरून... अनंत अंबानींचं शुभमंगल 'आमची मुंबई'तच; 'असा' आहे तीन दिवसांचा सोहळा 
13
"देशात इंडिया आघाडीची त्सुनामी, वाराणसीत नरेंद्र मोदी पराभूत होणार’’ मोदींविरोधात निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेस नेत्याचा दावा
14
"जितेंद्र आव्हाड मनोविकृत, त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा", मंत्री गुलाबराव पाटलांची मागणी
15
OYO ला आर्थिक वर्ष २४ मध्ये १०० कोटींचा निव्वळ नफा; पहिल्यांदाच नफ्यात आली कंपनी
16
"होय, मी संन्यास घ्यायला तयार"; अजित पवारांची अट अंजली दमानियांकडून मान्य, पण...
17
“PM मोदींनी महात्मा गांधींबाबत केलेले विधान म्हणजे देशाचे दुर्दैव”; पृथ्वीराज चव्हाणांची टीका
18
अरे देवा! नवऱ्याने रील बनवण्यास केली मनाई; नाराज झालेली बायको मुलीसह झाली फरार
19
Gautam Gambhir च्या विरोधात 'दादा'? गांगुलीचा BCCI ला सल्ला अन् चाहते बुचकळ्यात!
20
TATA चा 'हा' शेअर विकून बाहेर पडतायत गुंतवणूकदार; एक्सपर्ट म्हणाले, "१३५ पर्यंत येणार..."

...म्हणून LOCवरील 'या' भागातल्या हिंदूंच्या घरं अन् मंदिरांवर फडकतायत पाकिस्तानी झेंडे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 5:59 PM

पाकिस्तानच्या सिंध प्रांतातून भारताच्या निर्णयाचा तीव्र विरोध करण्यात आला आहे.

नवी दिल्लीः गुजरातला लागून असलेल्या नियंत्रण रेषेवरील काही भागातल्या घरं आणि दुकानांवर पाकिस्तानी झेंडे डौलानं फडकताना पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे फक्त दुकानं आणि घरांवरच नव्हे, तर हिंदूंच्या मंदिरांच्या कळसावरही पाकिस्तान झेंडे दिसत आहेत. खरं तर भारतातल्या गुजरात राज्यातून पाकिस्तानला जोडणाऱ्या कच्छ नियंत्रण रेषे(Kuchh Border)जवळ हा भाग आहे. या नियंत्रण रेषेवरील पाकिस्तानच्या भागात हिंदू बहुसंख्येनं (Pakistani Hindu) वास्तव्याला आहेत. थारपारकर हा जिल्हा पाकिस्तानमधल्या सिंध प्रांतामध्ये आहे. जिथे लाखोंच्या संख्येनं हिंदूंची लोकसंख्या आहे. सिंध प्रांता(Sindh Province)तील थारपारकर या जिल्ह्याची एकूण लोकसंख्या 17 लाखांच्या घरात आहे. ज्यात 41 टक्क्यांहून अधिक हिंदू आहेत. 2017च्या जनगणना अहवालात ही माहिती आहे.परंतु बीबीसीच्या एका रिपोर्टमध्ये पाकिस्तानच्या या जिल्ह्यात मुस्लिमांपेक्षा हिंदूंची संख्या जास्त असल्याचं सांगितलं आहे. गुजरातला लागून असलेल्या नियंत्रण रेषेवरील शेरावाली मातेच्या मंदिराच्या छतावर पाकिस्तानचा झेंडा फडकतो आहे. थारपारकरमधल्या हिंदूंच्या घर, गाड्या आणि काही मंदिरांवर पाकिस्तानी झेंडे दिसण्याचंही वेगळंच कारण आहे. खरं तर भारतानं जम्मू-काश्मीरमधलं कलम 370 रद्द करून त्याचं जम्मू-काश्मीर आणि लडाख अशा दोन केंद्रशासित प्रदेशामध्ये विभाजन केलं आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये भारताविरोधात राग आळवला जातोय.

पाकिस्तानच्या सिंध प्रांतातून भारताच्या या निर्णयाचा तीव्र विरोध करण्यात आला आहे. तिथली जनता आणि नेत्यांनी मिळून भारताचा झेंडा, नकाशासह मोदींचा पुतळाही जाळला होता. पाकिस्तानप्रति निष्ठा दाखवण्यासाठी हे हिंदू भारताविरोधात आक्रमक भूमिका घेत आहेत. पाकिस्तानमधले हिंदू पूर्णतः पाकिस्तानी सेना आणि काश्मिरी लोकांबरोबर आहेत. त्यामुळे पाकिस्तानमधल्या हिंदूबहूल सिंध भागात जागोजागी पाकिस्तानचे झेंडे दिसत आहेत. पाकिस्तानमधले हिंदू देशाप्रति असलेलं समर्थन आणि भावना दाखवण्यासाठी घर आणि गाड्यांवर पाकिस्तानचे झेंडे फडकावत आहेत. पुलवामा हल्ल्यानंतर भारतानं केलेल्या बालाकोट एअरस्ट्राइकनंतरही भारत आणि पाकिस्तानमधले संबंध बिघडले होते. त्यावेळी सिंध प्रांतातील हिंदूंनी भारताविरोधात भूमिका घेतली होती. 
कसा आहे थारपारकर भूभाग?गुजरातच्या थार वाळवंटाच्या नियंत्रण रेषेच्या पलिकडे असलेला हा एक मागास भाग आहे. यूएन रिपोर्टनुसार, थारपारकरमधली 87 टक्के लोकसंख्या ही अत्यंत हलाखीत दिवस काढत आहे. पाकिस्तानमध्ये जवळपास 80 लाख हिंदू आहेत. ज्यातील हिंदूंचा एक मोठा समूह थारपारकर भागात राहतो. विशेष म्हणजे दशकभरात इथे कोणत्याही सांप्रदायिक दंगली झालेल्या नाहीत. थारपारकर जिल्ह्यातील एका मोठ्या भागाचं नाव काश्मीर आहे. या काश्मीर चौकात नेहमीच मोठ्या यात्रा आणि सण-उत्सव साजरे केले जातात. या भागात हिंदूंची अर्ध्या डझनांहून अधिक प्रमुख मंदिरं आहेत. पाकिस्तानमधला थारपारकर हा जिल्हा पाकिस्तानमधल्या हिंदू धर्म आणि देश दोघांनाही वेगवेगळं ठेवत असून, देशाप्रति प्रेम व्यक्त करण्यासाठी इथले नागरिक नेहमीच पुढे असतात. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तान