शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: पहिल्याच सभेत फडणवीसांनी काढली मनातली भडास, ज्युनिअर ठाकरेंनाही सोडलं नाही! काय म्हणाले?
2
Eknath Shinde: 'मुंबईचा महापौर मराठीच होणार, ही काळ्या दगडावरची भगवी रेघ' वरळीतील सभेत एकनाथ शिंदे कडाडले!
3
Kim Jong Un : "माझे मित्र मादुरो यांना तातडीने सोडा, अन्यथा..."; अमेरिका-व्हेनेझुएला संघर्षात किम जोंग उनची एन्ट्री
4
सदानंद दाते महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक! रश्मी शुक्ला यांच्याकडून स्वीकारला पदभार
5
उद्धवसेनेच्या उमेदवारास 'मशाल' चिन्ह नाकारले; निवडणूक अधिकारी- दानवे समोरासमोर
6
ऑपरेशन सिंदूरचा धसका, ब्रह्मोसला प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानकडून 'तैमूर' मिसाईलची चाचणी
7
"अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे वर्तन गुंड, मवाल्यासारखे..."; Viral Video वरून काँग्रेसची टीका
8
Hyderabad: मुलांसोबत तलावाजवळ गेली अन्...; आईचं भयानक कृत्य, नातेवाईकांच्या पायाखालची जमीनच सरकली!
9
हलगर्जीपणाचा कळस! दीडवर्ष असह्य वेदना; ऑपरेशन करताना पोटात विसरले कात्री, महिलेचा मृत्यू
10
Smartphone: थेट ब्लॅकबेरी आणि आयफोनशी स्पर्धा? धमाकेदार अँड्राईड फोन बाजारात, कुणी केला लॉन्च?
11
पालघरजवळच्या खाडीत सहा-सात बगळे मृत अन् अर्धमेल्या अवस्थेत! संसर्ग की घातपात, चर्चांना उधाण
12
Donald Trump : "आमच्या कंपन्यांना बाहेर काढलं..."; व्हेनेझुएला एअर स्ट्राईकनंतर ट्रम्प यांचा जुना Video व्हायरल
13
IND vs NZ ODI: भारताचा संघ जाहीर; अय्यर IN; ऋतुराज, तिलक OUT, बुमराह-पांड्याला विश्रांती
14
"ते तर आता 'लीडर ऑफ पर्यटन'"; राहुल गांधींच्या परदेश दौऱ्यावर भाजपाची बोचरी टीका
15
टीम इंडियासाठी 'गुड न्यूज'! Shreyas Iyerला 'कमबॅक'साठी BCCIची मान्यता, 'या' तारखेला खेळणार
16
बांगलादेशात हिंदूंचं जगणं कठीण! एकाला खांबाला बांधून अमानुष मारहाण, प्रकृती चिंतानजक
17
Tarot Card: स्वामींचं नाव घेत एक कार्ड निवडा आणि पुढच्या आठवड्याचे साप्ताहिक भविष्य जाणून घ्या
18
हिवाळ्यात नारळ पाणी प्यावं की नाही? लोक हमखास करतात चूक, विसरु नका ‘ही’ योग्य वेळ
19
सोलापूर: निवडणुका बिनविरोध करण्यासाठीच 'तो' मर्डर! प्रणिती शिंदेंचा भाजपावर गंभीर आरोप
20
अभिनेते आशिष विद्यार्थी यांचा अपघात, भरधाव दुचाकीस्वाराने दिली धडक; पत्नीही जखमी
Daily Top 2Weekly Top 5

ताशफीन भारतात येऊन गेली होती

By admin | Updated: December 8, 2015 23:32 IST

कॅलिफोर्नियातील हत्याकांडात सहभागी संशयित ताशफीन मलिक (२७) पतीसह अमेरिकेत यायच्या आधी २०१३ मध्ये सौदी अरेबियातून भारतात येऊन गेली होती, असे वृत्त मंगळवारी ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने दिले

न्यूयॉर्क : कॅलिफोर्नियातील हत्याकांडात सहभागी संशयित ताशफीन मलिक (२७) पतीसह अमेरिकेत यायच्या आधी २०१३ मध्ये सौदी अरेबियातून भारतात येऊन गेली होती, असे वृत्त मंगळवारी ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने दिले. हत्याकांडानंतर ताशफीन मलिक व तिचा पती सईद फारुक हे पोलिसांनी केलेल्या पाठलागानंतरच्या चकमकीत ठार झाले होते.ताशफीन मलिक सौदी अरेबियाला दोन वेळा भेट देऊन आली होती, असे वृत्तात सौदी अरेबियाअंतर्गत मंत्रालयाचे प्रवक्ते मन्सूर टर्की यांचा हवाला देऊन म्हटले आहे. या दोनपैकी एका भेटीनंतर ती भारताला रवाना झाली होती. टर्की म्हणाले की, मलिक पाकिस्तानातून जून २००८ मध्ये सौदी अरेबियात तिच्या वडिलांना भेटायला आली होती. सुमारे नऊ महिने ती तेथे राहिल्यानंतर पाकिस्तानला परतली. त्यानंतर ८ जून २०१३ रोजी ती पाकिस्तानातून सौदी अरेबियात आली आणि त्याचवर्षी ६ आॅक्टोबर रोजी भारताकडे रवाना झाली. मात्र, ती भारतात पोहोचली का, तेथे ती कुठे, किती दिवस व कोणाकडे मुक्कामाला होती याची माहिती मिळू शकली नाही, असे वृत्तात म्हटले आहे.फारुकनेही सौदी अरेबियाला दोन वेळा भेट दिली होती. त्यापैकी एक भेट आॅक्टोबर २०१३ मध्ये हाज यात्रेत होती. त्याची दुसरी भेट जुलै २०१४ मध्ये उमराह यात्रेला होती. हे जोडपे जुलै २०१४ मध्ये जेद्दाहहून अमेरिकेला बरोबरच आले, असे अधिकाऱ्यांनी म्हटले. (वृत्तसंस्था)ताशफीन मलिकचे पाकिस्तानातील नातेवाईक आणि तिला ओळखणाऱ्यांनी सांगितल्यानुसार ती सौदी अरेबियात लहानाची मोठी झाली आणि तेथे इस्लामचे जे अत्यंत कर्मठ स्पष्टीकरण करण्यात आले त्याचा तिच्यावर खूप खोलवर परिणाम झाला. सौदी अरेबियात मलिकने लक्षणीय काळ घालविल्याचा सौदीच्या अधिकाऱ्यांनी इन्कार केला व ती सौदीत केवळ दोन वेळाच आली होती व तेही दोन्ही भेटींचा एकूण काळही काही महिन्यांचाच होता, असे ते म्हणाले.