शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

Tariff Refund: सर्वोच्च न्यायालयानं ट्रम्प यांचं सगळंच गणित बिघडवलं, आता अमेरिकेला करावा लागणार टॅरिफ रिफंड? कुणाला होणार फायदा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 15:37 IST

न्यायालयाने ट्रम्प टॅरिफ रद्द केल्याने आता या देशांवरील आयात शुल्कातही मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे.

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'रेसिप्रोकल टॅरिफ'ला अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने बेकायदेशीर ठरवत, जोरधार दणका दिला. खरे तर, सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाने ट्रम्प यांचे  संपूर्ण आर्थिक गणितच बिघडले आहे. महत्वाचे म्हणजे, न्यायालयाच्या या निर्णयाने भारत, चीन, कॅनडा, ब्राजील आणि मॅक्सिको आदी देशांना मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने ट्रम्प टॅरिफ रद्द केल्याने आता या देशांवरील आयात शुल्कातही मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे.

व्हाईट हाऊसच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, "सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर भारतावर लागू असलेला १८% टॅरिफ आता १०% पर्यंत खाली येईल." एएनआयच्या वृत्तानुसार, आंतरराष्ट्रीय आणीबाणी आर्थिक शक्ती कायद्यांतर्गत (IEEPA) लावण्यात आलेल्या टॅरिफची जागा आता आता कलम १२२ अंतर्गत लावण्यात आलेला नवा टॅरिफ घेईल. ट्रम्पची घोषणा आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे युरोपियन युनियन, जपान आणि दक्षिण कोरियावरील शुल्क १५% वरून १०% पर्यंत कमी होईल, तर व्हिएतनामवरील शुल्क २०% वरून १०% पर्यंत कमी केले जाईल.

एकट्या २०२५ मध्येच २०० अब्ज डॉलर्सचा महसूल - महत्वाचे म्हणजे, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफच्या माध्यमातून आगामी दशकात अब्जावधी डॉलर्सच्या महसुलाचे उद्दिष्ट ठेवले होते. एकट्या २०२५ मध्येच यातून २०० अब्ज डॉलर्सचा महसूल जमा झाला होता. मात्र, आता हा टॅरिफ रद्द झाल्याने 'रिफंड'चा प्रश्न उभा राहिला आहे. 

टॅरिफ रिफंडचा फायदा कुणाला? -दरम्यान आता, ज्या अमेरिकन आयातदारांनी थेट टॅरिफ भरला आहे अथवा ज्यांच्याकडे सीमा शुल्क भरल्यानंतर मालाची मालकी आली आहे, तेच रिफंडसाठी पात्र ठरतील. तसेच, ज्या व्यवसायांनी थेट शुल्क भरलेले नाही, त्यांना रिफंड अथवा परतावा मिळणार नाही, असे अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सने स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे, या निर्णयामुळे सुमारे २ लाख छोट्या व्यावसायिक आयातदारांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : US court overturns Trump's tariff policy, refund may benefit India.

Web Summary : The US Supreme Court struck down Trump's 'reciprocal tariff' policy, benefiting India, China, and others. Reduced tariffs, like the one on India which is now 10%, offer relief to importers. A potential refund could provide financial support to small businesses.
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाIndiaभारतchinaचीन