अफगाणच्या लष्करी तळांवर तालिबानचे हल्ले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2020 06:03 AM2020-03-04T06:03:20+5:302020-03-04T06:03:24+5:30

अमेरिकेशी शांतता करार होऊन दोनच दिवस उलटल्यानंतर तालिबानने अफगाणिस्तानच्या १२पेक्षा अधिक लष्करी तळांवर हल्ले केल्याची घटना घडली आहे.

Taliban Attacks on Afghan Military Base | अफगाणच्या लष्करी तळांवर तालिबानचे हल्ले

अफगाणच्या लष्करी तळांवर तालिबानचे हल्ले

Next

काबूल : अमेरिकेशी शांतता करार होऊन दोनच दिवस उलटल्यानंतर तालिबानने अफगाणिस्तानच्या १२पेक्षा अधिक लष्करी तळांवर हल्ले केल्याची घटना घडली आहे. यामुळे आता देशांतर्गत शांतता करारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मागील शनिवारी अमेरिका व तालिबानने दोहामध्ये शांतता करार केला आहे. त्याआधी आठवडाभर
अंशत: शस्त्रसंधी केली होती. १० मार्चपासून अफगाणच्या अंतर्गत शांतता करारावर चर्चा सुरू होणार असून, त्यापूर्वीच एका कैद्याच्या अदलाबदलीवर वाद निर्माण झाला. आता ही चर्चा होणार की नाही, असा पेच निर्माण झाला आहे. करारानुसार १,००० कैद्यांना मुक्त करण्यात येणार आहे व अफगाण सरकारकडून ५,००० बंडखोरांना मुक्त करण्याचा वायदा करण्यात आला आहे. काही उग्रवाद्यांनी चर्चेसाठी अट ठेवली आहे; परंतु अफगाणिस्तानचे राष्टÑाध्यक्ष अशरफ गनी यांनी चर्चा सुरू होण्यापूर्वी अटी स्वीकारण्यास नकार दिला आहे. त्यातच तालिबानने  केलेल्या हल्ल्यानंतर चर्चेचा मार्ग अधिकच बिकट झाल्याचे मानले जात आहे.

Web Title: Taliban Attacks on Afghan Military Base

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.