शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 16:58 IST

चीन तैवानच्या सैन्याला आणि जनतेला मानसिक कमकुवत करू इच्छिते असं तज्ज्ञ सांगतात.

तैवान आणि चीन यांच्यात पुन्हा एकदा तणाव वाढला आहे. गुरुवारी रात्रीपासून शुक्रवारी सकाळपर्यंत चीनने तैवानच्या दिशेने ७४ लढाऊ विमाने पाठवली, ज्यातील ६१ विमाने तैवानची मिडलाइन पार केली होती. ही सीमा अनौपचारिक मानली जाते, जी तैवान आणि चीनला अंतर राखण्याचे संकेत देते. चीनची लढाऊ विमाने दोन वेगवेगळ्या ग्रुपमध्ये पाठवली होती. इतक्या मोठ्या संख्येने लढाऊ विमाने का पाठवली हे अद्याप स्पष्ट नाही असं तैवानच्या संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. 

चीननं दाखवली ताकद, तैवानला घेरण्याची धमकी?

चीन तैवानला त्यांचाच भाग मानते, त्यामुळे या प्रकारच्या सैन्य कारवाईमुळे तैवानला घेरण्याची अथवा घाबरण्याचा प्रयत्न करत असते. चीन तैवानच्या सैन्याला आणि जनतेला मानसिक कमकुवत करू इच्छिते असं तज्ज्ञ सांगतात. जेणेकरून संभाव्य संघर्षात त्यांना मानसिक बळ मिळू नये. यावेळी लढाऊ विमानांसोबतच ६ चिनी सैन्य जहाजही पाहण्यात आले. 

ब्रिटनच्या जहाजाच्या एन्ट्रीने चीन संतापला?

या तणावामागे आणखी एक पैलू आहे तो म्हणजे ब्रिटनची उपस्थिती, एक दिवसाआधीच ब्रिटन रॉयल नेव्हीचे पेट्रोल क्राफ्ट HMS Spey तैवान स्ट्रेटवरून गेले. तैवानच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून त्यांचे उघडपणे स्वागत करण्यात आले. त्यामुळे ही तैवानची सागरी सीमा आहे हे स्पष्ट झाले. तर HMS Spey चे मिशन आंतरराष्ट्रीय कायदे आणि सागरी अधिकारांमधून झाले आहे असं ब्रिटनने म्हटले. 

चीनला मिरची का झोंबली?

ब्रिटनच्या या पाऊलामुळे चीनचा थयथयाट झाला आहे. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने ईस्टर्न थिएटर कमांडने निवेदन जारी करत म्हटलंय की, त्यांनी HMS SPey च्या हालचालींवर नजर ठेवली आणि त्यांचा सामना करण्यासाठी पर्यायी सैन्य कारवाई केली होती. ब्रिटीश जहाज जाणुनबुजून तैवानच्या शांतता आणि स्थिरतेला नुकसान पोहचवत आहे असं चीनने म्हटले. परंतु चीनने इतक्या मोठ्या प्रमाणात लढाऊ विमाने का पाठवली, ती ब्रिटनला उत्तर देण्यासाठी होती की नाही याबाबत स्पष्ट कुणी सांगितले नाही.

टॅग्स :chinaचीन