शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

"दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या व्यवस्था अन् संस्था कोलमडत आहेत"; गयानाच्या संसदेत काय बोलले PM मोदी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2024 22:20 IST

PM Modi Guyana Visit: "गयानामध्ये लोकशाही बळकट करण्याचा प्रत्येक प्रयत्न जगाला बळकट करत आहे."

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (21 नोव्हेंबर) गयाना येथे संसदेच्या विशेष अधिवेशनाला संबोधित केले. यावेळी मोदी म्हणाले, गयाना आणि भारताची मैत्री खूप जुनी आहे. 180 वर्षांपूर्वी भारतीयांनी या भूमीवर पाऊल ठेवले. दोघांनीही स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला. येथे गांधीजींच्या जवळच्या लोकांनी एकत्रितपणे स्वातंत्र्यासाठी लढा दिला आणि स्वातंत्र्य मिळवले. आज आपण दोन्ही देश लोकशाही मजबूत करत आहोत.

मोदी पुढे म्हणाले, "गयानामध्ये लोकशाही बळकट करण्याचा प्रत्येक प्रयत्न जगाला बळकट करत आहे. आपल्याला स्वातंत्र्य मिळाले तेव्हाची आव्हाने वेगळी होती आणि आज २१व्या शतकातील आव्हाने वेगळी आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या व्यवस्था आणि संस्था कोलमडत आहेत. कोरोनानंतर जगाने एका नव्या जागतिक व्यवस्थेकडे वाटचाल करायला हवी होती. मात्र आज जग काही इतर गोष्टींमध्येच अडकले आहे. जर आपण मानवता प्रथम या भावनेने काम केले तर आपण मानवतेसाठी कार्य करण्यास कटिबद्ध राहू."

आपण प्रत्येक चढ-उतारावर लोकशाही मजबूत करत आहोत आणि लोकशाहीपेक्षा मोठे कुठलेही माध्यम नाही. लोकशाही प्रत्येक नागरिकाला त्याचे हक्क प्रदान करते आणि त्याच्या उज्वल भविष्यासाठी कामना करते.

'भारत एक 'विश्व बंधू' म्हणून आपले कर्तव्य पार पाडतोय' -पीएम मोदी म्हणाले, "भारत आणि गयानाचे नाते अत्यंत घनिष्ठ आहे, ते मातीचे, घामाचे आणि मेहनतीचे नाते आहे. सुमारे 180 वर्षांपूर्वी एक भारतीय गयानाच्या भूमीवर आला. तेव्हापासून आनंद आणि दु:ख्खाच्या क्षणी भारत आणि गयाना यांच्यातील संबंध आत्मीयतेने भरलेले आहेत. लोकशाही प्रथम, मानवता प्रथम या भावनेने भारत एक 'विश्व बंधू' म्हणून आपले कर्तव्य पार पाडत आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीdemocracyलोकशाही