सीरियाचेराष्ट्राध्यक्ष अहमद अल शरा आणि संरक्षण मंत्री त्यांच्या कुटुंबीयांसह राजधानी दमास्कसमधून पळून गेल्याचे वृत्त आहे. अल मायादीन वृत्तपत्राने सरकारी सूत्रांचा हवाला देऊन हा दावा केला आहे. अल शारा यांनी कालच सिरियाशी युद्धाची भाषा केली होती. पण आज मात्र सीरियाच्या सैन्याने ड्रुझ समुदायाचे प्राबल्य असलेल्या स्वेदा प्रांतावर ताबा मिळवला असताना, अल शारा यांनी पळ काढल्याचे वृत्त समोर आले आहे. वृत्तपत्रानुसार, अल शारा आणि त्याचे कुटुंब इदबिबला रवाना झाले आहेत. सीरियातील इदबिब शहर हे तुर्कीच्या सीमेजवळ आहे. तर संरक्षणमंत्री कुठे गेले, याची माहिती मिळालेली नाही.
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
तुर्कीने २ दिवसांपूर्वी दिला होता सल्ला
१६ जुलैला जेव्हा इस्रायलने दमास्कसमधील संरक्षण मंत्रालय आणि सीरियन लष्कराच्या मुख्यालयावर हल्ला केला, तेव्हा तुर्कीने सीरियन राष्ट्राध्यक्षांना तात्काळ राष्ट्रपती भवन सोडण्याचा सल्ला दिला होता. टार्गेट किलिंगचा मुद्दा लक्षात आणून देत त्यांना हा सल्ला देण्यात आला होता. अहमद अल शरा इस्रायलच्या रडारवर आहेत. इस्रायलच्या अंतर्गत सुरक्षा मंत्र्यांनी हमास कमांडरसारखीच अल शारा यांची हत्या करू अशी घोषणा केली आहे. तसेच, इस्रायली सैन्याने १६ जुलै रोजी अहमद अल शारा यांच्या घराजवळ क्षेपणास्त्र हल्ला देखील केला होता.
सिरिया राष्ट्राध्यक्षांची युद्धाची भाषा
इस्रायलने सिरियावर हल्ल्या केल्यानंतर सीरियाचे राष्ट्राध्यक्ष अहमद अल-शारा यांनी निवेदन जारी केले होते. त्यात म्हटले होते की, आम्ही युद्धाला घाबरत नाही, आम्ही आमचे संपूर्ण आयुष्य आव्हानांशी लढण्यात घालवले आहे. इस्रायलवर सीरियामध्ये जातीय फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. एका आघाडीवर विजय मिळणे म्हणजे सर्वत्र विजय निश्चित असे होत नाही. सीरिया कोणताही बाह्य हस्तक्षेप स्वीकारणार नाही. विशेषतः ड्रुझच्या बाबतीत काहीही ऐकणार नाही, असे काल अल-शारा म्हणाले होते.
इस्रायली सैन्या टार्गेट किलिंगमध्ये निष्णात
इस्रायली सैन्य 'लक्ष्य हत्या' म्हणजे टार्गेट किलिंगमध्ये निष्णात आहे. गेल्या एका वर्षात, इस्रायली सैनिकांनी हिजबुल्लाह आणि हमासचे वरिष्ठ कमांडर, एक डझन इराणी अणुशास्त्रज्ञ आणि अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची हत्या केली आहे. मध्य पूर्वेतील बहुतेक देशांमध्ये मोसादचे नेटवर्क मजबूत आहे. त्यामुळेच सर्व देश इस्रायलच्या टार्गेट किलिंगच्या दहशतीखाली आहेत.