Syria Anchor video, Israel Air strike : इस्रायलनेसीरियाच्या दमास्कस शहरावर मोठा हल्ला केला आहे. हल्ल्याच्या वेळी सर्वत्र प्रचंड धुराचे लोट दिसत होते. इस्रायली सैन्याने दमास्कस शहरावर हल्ला केला, तेव्हा एका टीव्ही चॅनेलवर एक लाईव्ह कार्यक्रम सुरू होता. हल्ल्याचा परिणाम इतका जोरदार होता की टीव्हीवर लाईव्ह शो करणारी महिला अँकर कार्यक्रम सोडून पळून गेली. इस्रायलने म्हटले आहे की जर सीरियाच्या सरकारी सैन्याने दक्षिण सीरियातील ड्रुझ समुदायावर हल्ला सुरू ठेवला, तर इस्रायल सिरियाचा नाश करेल. सोमवारी, ड्रुझ लढवय्ये आणि बेदौइन जमातींच्या सशस्त्र पुरुषांमधील लढाई थांबवण्यासाठी सीरियाच्या सरकारने स्वेदा शहरात आपले सैन्य पाठवले. परंतु नंतर सीरियाच्या सैन्याची स्वतः ड्रुझ लढवय्यांशी चकमक झाली. त्यानंतर सिरियावर केलेल्या हल्ल्यात सर्वत्र हलकल्लोळ माजला.
गेल्या काही दिवसांपासून इस्रायल आणि सिरिया यांच्यात संघर्ष सुरू आहे. त्यामुळे न्यूज अँकर्स कायमच अलर्ट मोडवर आहेत. पण आजच्या हल्ल्याच्या वेळी सर्वत्र दाणादाण उडाली. हवेत मोठमोठे धुराचे लोट दिसत होते. इस्रायली सैन्याने दमास्कस शहरावर इतका मोठा हल्ला केला, की बिल्डिंगच्या चिंधड्या उडाल्या. त्याचे हादरे केवळ भौगोलिकच नव्हे तर भावनिक हादरा देऊन गेले. त्यामुळेच एका टीव्ही चॅनेलवर एक लाईव्ह कार्यक्रम सुरू होता. हल्ल्याचा परिणाम इतका जोरदार होता की टीव्हीवर लाईव्ह शो करणारी महिला अँकर कार्यक्रम सोडून पळून गेली.
इस्रायलने ड्रुझ लोकांचे संरक्षण करण्याचा दावा
इस्रायलमध्ये राहणारे ड्रुझ नागरिक देखील त्यांच्या सैन्याकडून सीरियातील ड्रुझ लोकांचे संरक्षण करण्याची मागणी करत आहेत. मंगळवारी, एका ड्रुझ धार्मिक नेत्याने सांगितले की त्यांच्या समुदायावर सरकारकडून क्रूरपणे हल्ला केला जात आहे. दुसरीकडे, सीरिया सरकार म्हणते की काही बेकायदेशीर टोळ्या या हिंसाचारामागे आहेत. यापूर्वीही, सीरियामध्ये बशर अल-असद यांच्या राजवटीत, इस्रायल तेथे वारंवार बॉम्बहल्ला करत असे. आता इस्रायलने नवीन सरकारला दक्षिण सीरियातून आपले सैन्य मागे घेण्यास सांगितले आहे. इस्रायलने ड्रुझ लोकांचे संरक्षण करण्याचे आश्वासन दिले आहे आणि गोलान हाइट्सला लागून असलेल्या आणि इस्रायलच्या ताब्यात असलेल्या सीरियाच्या त्या भागात आपले सैन्य पाठवले आहे.
दरम्यान, बुधवारी इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, इस्रायली सैन्य सरकारी सैन्यावर हल्ला करत राहील जोपर्यंत ते या भागातून माघार घेत नाहीत आणि जर हे प्रकरण समजले नाही, तर लवकरच राजवटीविरुद्ध प्रत्युत्तर देखील तीव्र केले जाईल.