शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
2
IPL 2024 GT vs CSK : चेन्नईने टॉस जिंकला! ऋतुराजने १ बदल केला, शुबमनने दोघांना बाकावर बसवले
3
नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी
4
ऐकावं ते नवलंच! 1990पासून जमवली होती 'पोकेमॉन कार्ड्स', लागली लाखोंची बोली, किंमत ऐकून थक्क व्हाल
5
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
6
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
7
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
8
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
9
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
10
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
11
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...
12
"तुमचं माझ्यावरचं, माझं तुमच्यावरचं प्रेम 'अक्षय' राहो..", प्राजक्ता माळीने केली नव्या सिनेमाची घोषणा
13
"ही ऑफर म्हणजे भाजपा पुन्हा सत्तेत येत नसल्याची कबुलीच", रोहित पवारांचा टोला
14
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे
15
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
16
"लाज वाटायला पाहिजे, थोडी तरी...", लखनौच्या मालकांवर मोहम्मद शमीचे टीकेचे बाण
17
आजारपणात या अभिनेत्रीच्या नवऱ्याने सोडली साथ, सलमान खान ठरला देवदूत, आता भाईजानबद्दल म्हणाली...
18
...म्हणजे तुम्ही शरद पवारांना ओळखलंच नाही; जितेंद्र आव्हाडांचा PM मोदींवर निशाणा
19
ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाला मिळणार नवीन गुरू? BCCI कडून हालचालींना वेग
20
पालघरमधील सहाही आमदार आमच्यासोबत, हितेंद्र ठाकूर यांनी वाढवलं भाजपा आणि ठाकरे गटाचं टेन्शन

सिडनीच्या मॉलमध्ये गोळीबार आणि चाकूहल्ला, सहा जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2024 3:00 PM

Sydney Shopping Centre Attack: वेस्टफील्ड बाँड जंक्शनच्या शॉपिंग सेंटरमध्ये गोळीबार आणि चाकूहल्ला झाला.

सिडनी : ऑस्ट्रेलियातील सिडनी येथील एका शॉपिंग मॉलमध्ये गोळीबार आणि चाकूने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात सहा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, वेस्टफील्ड बाँड जंक्शनच्या शॉपिंग सेंटरमध्ये गोळीबार आणि चाकूहल्ला झाला. या घटनेनंतर शॉपिंग मॉल रिकामा करण्यात येत आहे. पोलिस बचावकार्य करत आहेत. पोलिसांनी हल्लेखोराला ठार केल्याचे वृत्त आहे. मात्र, अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

ऑस्ट्रेलियन न्यूज वेबसाइट news.com.au नुसार, ही घटना घडली तेव्हा मॉलमध्ये गर्दी होती. जमिनीवर सर्वत्र रक्त पसरले होते, असे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले. तर मिळालेल्या माहितीनुसार, शेकडो लोकांना मॉलमधून बाहेर काढण्यात आले आहे. तसेच, न्यू साउथ वेल्स पोलिसांनी लोकांना या भागापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.

या वेबसाइटच्या वृत्तानुसार, एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, जॉनी सँटोस आणि केविन त्जो वूलवर्थ्समध्ये खरेदी करत असताना एक व्यक्ती एस्केलेटरवरून खाली आला आणि त्याने ओरडून सांगितले की, एक व्यक्ती लोकांना चाकू मारत आहे. तेवढ्यात हिरवा शर्ट घातलेला एक माणूस खाली पळताना दिसला. तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचे दिसून येत होते. काही जणांनी त्याच्यावर निशाणा साधून बोलार्ड फेकले. दरम्यान, तो स्केलेटरवरून मागे पळून गेला.

दरम्यान,पोलिसांनी अधिक तपास करत हा दहशतवादी हल्ला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला. या हल्ल्यानंतर मॉलमध्ये एकच गोंधळाची स्थिती निर्माण झाली. सद्यस्थितीत पोलिसांनी संपूर्ण मॉल परिसरातील सुरक्षेत वाढ केली आहे. तसेच, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून काही फोटोही समोर येत आहेत.

टॅग्स :Australiaआॅस्ट्रेलियाInternationalआंतरराष्ट्रीय