शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

'काळा पैसा'वाल्यांवर पडणार कुऱ्हाड! स्विसमधल्या खातेधारकांची माहिती मिळण्याची प्रक्रिया सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 09:15 IST

स्विस बँकेतल्या भारतीय खातेधारकांची माहिती लवकरच भारत सरकारला मिळणार आहे.

नवी दिल्ली- स्विस बँकेतल्या भारतीय खातेधारकांची माहिती लवकरच भारत सरकारला मिळणार आहे. स्वित्झर्लंडच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भातील कारवाईला सुरुवात केली आहे. स्विस अधिकाऱ्यांनी एचएसबीसी बँकेत खाते असलेल्या भारतीय लोकांना यासंबंधी एक लिखित स्वरूपात नोटीसही पाठवली आहे.इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, ऑगस्ट 2008मध्येच स्वित्झर्लंडच्या फेडरल कोर्टाच्या निर्णयानंतर स्विसमधल्या खातेधारकांची माहिती देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. जवळपास दीड महिन्यांपूर्वी स्विस बँकेत खाती असलेल्या भारतीय खातेधारकांना फेडरल टॅक्स अ‍ॅडमिनिस्ट्रेशनकडून नोटीसही पाठवण्यात आली होती. भारताकडून मागणी करण्यात आलेल्या काळा पैशाची माहिती ही दोन्ही देशांच्या द्विपक्षीय करारांतर्गत येते. नोटीसमध्ये एप्रिल 2011पासून खातेधारकांना माहिती देण्यास सांगण्यात आलं होतं.फेडरल बँकेच्या आदेशानंतर भारतीय खातेधारकांना एक सहमती पत्रही भरण्यासाठी सांगण्यात आले होते. भारतीय अधिकाऱ्यांनी मागितलेल्या सूचना देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचंही या पत्रात लिहिलं आहे. वर्षं  2011मध्ये फ्रान्सकडून भारताला स्वित्झर्लंडच्या एचएसबीसी बँकेतील खातेधारकांच्या 628 भारतीयांची नावं मिळाली आहेत. त्यानंतर 2015मध्ये केलेल्या खुलाशामध्ये 1195 भारतीयांची नावं समोर आली होती. 2006-07मध्ये स्विस बँक खात्यांमध्ये भारतीय खातेधारकांचे जवळपास 25420 कोटी रुपये असल्याची माहिती समोर आली आहे. यातील 85 लोक भारतीय नागरिक आहेत. तसेच त्यांचे एक मिलियन डॉलर पैसे या खात्यांमध्ये जमा आहेत. तत्पूर्वी फ्रान्सनं एचएसबीसीमध्ये जवळपास 700 भारतीयांच्या खातेधारकांची माहिती ऑगस्ट 2011ला दिली होती. त्यानंतर जगभरातल्या इतर देशातील सरकारांनीही कारवाई केली होती.  

टॅग्स :Swiss Bankस्विस बँकblack moneyब्लॅक मनी