शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या एका मिनिटात वेदनारहित, शांततापूर्ण मृत्यू; 'या' देशाने दिली इच्छामरणाच्या मशीनला परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2021 22:02 IST

Suicide Machine Sarco : इच्छामरण देण्याऱ्या मशीनला आता कायदेशीर मान्यता दिली आहे.

जगणं सुसह्य होण्यासाठी विविध गोष्टी केल्या जातात. पण आता मरण सुसह्य होणाऱ्या एका मशीनची निर्मिती करण्यात आली आहे. स्वित्झर्लंडने (Switzerland)  इच्छामरण देण्याऱ्या मशीनला आता कायदेशीर मान्यता दिली आहे. यामुळे एक मिनिटात वेदनारहित आणि शांततापूर्ण मृत्यू होणार आहे. शवपेटी आकाराच्या या कॅप्सूनला स्वित्झर्लंडमध्ये कायदेशीर करण्यात आली असल्याची माहिती याच्या निर्मात्यांनी दिली आहे. या पेटीमध्ये एखाद्या व्यक्तीला ऑक्सिजन पातळी कमी करून हायपोक्सिया आणि हायपोकॅप्निया द्वारे मृत्यू दिला जातो.

एका रिपोर्टनुसार, लॉक्ड इन सिंड्रोमने त्रस्त असलेल्या लोकांना याचा फायदा होणार आहे. या अवस्थेमध्ये रुग्ण जिवंत असतो पण त्याचं शरीर हालचाल करू शकत नाही. आजारपणामुळे बोलता किंवा हालचाल करू न शकणाऱ्या रुग्णांसाठी हे मशीन उपयुक्त असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. हे मशीन बनवण्याची कल्पना एक्झिट इंटरनॅशनलचे संचालक आणि डॉक्टर फिलिप निट्स्के यांनी दिली आहे, डॉक्टर फिलिप हे 'डॉक्टर डेथ' य़ा नावाने अत्यंत लोकप्रिय आहेत. 

स्वित्झर्लंडमध्ये मदत घेऊन मृत्यू पत्करणे कायदेशीर मानले जाते आणि गेल्या वर्षी 1300 लोकांनी इच्छा मृत्यूसाठी या सेवेचा वापर केला. मात्र, या मशीनवरही प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. लोकं डॉक्टर डेथवरही टीका करत आहेत. ते गॅस चेंबरसारखे आहे असं म्हटलं आहे. हे यंत्र आत्महत्येला प्रोत्साहन देते, असेही काहींचे म्हणणे आहे. सध्या फक्त दोन Sarco प्रोटोटाइप अस्तित्वात आहेत. मात्र तिसरे मशीन 3D प्रिंट करत असून ते पुढच्या वर्षी स्वित्झर्लंडमध्ये तयार होईल अशी अपेक्षा आहे.

ऑक्सिजनची पातळी 21 टक्क्यांवरून 1 पर्यंत होते कमी 

इच्छा मरण देणारे हे मशीन शवपेटीच्या आकाराचे असून यामध्ये ऑक्सिजनची पातळी ही हळूहळू कमी करून हायपोक्सिया आणि हायपोकॅप्नियाद्वारे मृत्यू देते. या प्रक्रियेत नायट्रोजनचे प्रमाण अवघ्या 30 सेकंदात अनेक पटींनी वाढते, त्यामुळे ऑक्सिजनची पातळी 21 टक्क्यांवरून 1 पर्यंत कमी होते आणि काही सेकंदातच माणसाचा मृत्यू होतो. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Switzerlandस्वित्झर्लंड