शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

स्विस बँकेने ५० भारतीय खातेदारांना बजावली नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2019 06:40 IST

मलिन प्रतिमा सुधारण्यासाठी स्वित्झर्लंडचा पुढाकार

नवी दिल्ली / बर्न : स्वित्झर्लंडमधील बँकांमध्ये अघोषित खाते ठेवणाऱ्या भारतीयांविरुद्ध दोन्ही देशांच्या सरकारांनी फास आवळायला सुरुवात केली आहे. या प्रकरणात किमान ५० भारतीय लोकांची माहिती भारतीय अधिकाऱ्यांना सोपविण्यासाठी स्वित्झर्लंडच्या अधिकाºयांनी तयारी सुरु केली आहे.स्वित्झर्लंडमध्ये खाते असणाऱ्या लोकांमध्ये जमिनी, आर्थिक सेवा, तंत्रज्ञान, दूरसंचार, पेंट, कपडे, इंजिनिअरिंगशी संबंधित वस्तू आणि रत्न व दागिने क्षेत्राशी संबंधित व्यवसायिक कंपन्यांचा समावेश आहे. यातील काही डमी कंपन्याही असू शकतात. दोन्ही देशात माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी असलेल्या प्रशासकीय अधिकाºयांनी ही माहिती दिली.कर चोरी करणाºयांना स्वित्झर्लंडकडून आश्रय दिला जातो अशी टीका यापूर्वीपासून होत होती. देशाची ही प्रतिमा सुधारण्यासाठी स्वित्झर्लंड विविध देशांना आता माहिती देत आहे. भारतात काळ्या पैशांचा मुद्दा राजकीय स्तरावर संवेदनशिल आहे. स्वित्झर्लंड सरकारने गॅझेटमधून माहिती सार्वजनिक करताना पूर्ण नाव न सांगता केवळ सुरुवातीची अक्षरे सांगितली आहेत. याशिवाय ग्राहकाची राष्ट्रीयता आणि जन्म दिवस याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यानुसार, २१ मे रोजी ११ भारतीयांना नोटीस जारी करण्यात आली आहे. यात दोन जणांची पूर्ण नावे सांगण्यात आली आहेत.यात मे १९४९ चा जन्म असलेले कृष्ण भगवान रामचंद आणि सप्टेंबर १९७२ चा जन्म असलेले कल्पेश हर्षद किनारीवाला यांचा समावेश आहे. अर्थात, त्यांच्याबाबत अन्य माहितीचा खुलासा करण्यात आला नाही. अन्य नावे जाहीर करताना २४ नोव्हेंबर १९४४ चा जन्म असलेले एएसबीके याप्रमाणे उल्लेख करण्यात आला आहे. या नोटीसमध्ये म्हटले आहे की, संबंधित ग्राहक अथवा त्यांचे प्रतिनिधी यांनी आवश्यक दस्तऐवजांसह ३० दिवसांच्या आत अपील करण्यासाठी हजर रहावे.अपील करण्याची शेवटची संधीस्वित्झर्लंडच्या अधिकाºयांनी मार्चपासून आतापर्यंत किमान ५० भारतीय खातेधारकांना नोटीस देत, त्यांची माहिती भारत सरकारला देण्यापूर्वी त्यांना अपील करण्याची शेवटची संधी दिली आहे. स्वित्झर्लंडच्या बँकेत खाते सुरू करणाºयांची माहिती गोपनीय ठेवली जाते. त्यामुळे जागतिक स्तरावर एक आर्थिक केंद्र म्हणून स्वित्झर्लंडकडे बघितले जाते, पण करचोरीच्या प्रकरणावर जागतिक स्तरावर करार झाल्यानंतर गोपनीयतेची ही भिंत आता राहिली नाही. खातेधारकांची माहिती शेअर करण्याबाबत त्यांनी भारतासोबत करार केला आहे. अन्य देशांसोबतही असे करार करण्यात आले आहेत.

टॅग्स :Swiss Bankस्विस बँक