शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

सार्क देशांच्या बैठकीत सुषमा स्वराज यांनी दुर्लक्ष केल्यानं पाकच्या परराष्ट्र मंत्र्यांचा तीळपापड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2018 10:39 IST

भारत आणि पाकिस्तानमध्ये दिवसेंदिवस तणाव वाढत आहे.

न्यूयॉर्क- भारत आणि पाकिस्तानमध्ये दिवसेंदिवस तणाव वाढत आहे. त्यामुळे भारतानं पाकिस्तानबरोबरच्या सर्व चर्चा थांबवल्या होत्या. त्यातच पाकिस्तानकडून कायम शस्त्रसंधीचं उल्लंघन होत असल्यानं दोन्ही देशांमध्ये तणाव वाढत चाललाय. याचा प्रत्यय अमेरिकेतल्या न्यूयॉर्कमध्ये आयोजित दक्षिण आशिया क्षेत्रीय सहयोग संघटने(सार्क)च्या बैठकीतही पाहायला मिळालं.खरंतर न्यूयॉर्कमध्ये सार्क देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनीही भाग घेतला होता. परंतु सुषमा स्वराज या भाषण दिल्यानंतर बैठकीतून निघून गेल्या. त्यामुळे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री महमूद कुरेशी यांनी सुषमा स्वराज यांच्या भूमिकबाबत नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणजे सुषमा स्वराज यांच्यानंतर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री यांचं भाषण होणार होतं. तत्पूर्वीच सुषमा एका कार्यक्रमानिमित्तानं तिथून बाहेर पडल्या. या प्रकारानंतर महमूद कुरेशी यांना राग अनावर झाला.ते म्हणाले, जर शांतीच्या दृष्टिकोनातून चर्चा करायची असल्यास दोन्ही देशांना एक पाऊल पुढे यावे लागेल. परंतु सुषमा स्वराज यांची ही कुठली पद्धत आहे ?, जर सार्क देशांच्या प्रगतीत कोणी बाधा बनत असेल, तर ती एका देशाची भूमिका आहे. तसेच सुषमा स्वराज आणि आमच्यामध्ये कोणतीही चर्चा झालेली नाही. सुषमा स्वराज बैठकीतून निघून गेल्या. कदाचित त्यांची तब्येत ठीक नसावी, मी त्यांचं भाषण ऐकलं, त्यांना क्षेत्रीय सहयोग वाढवायचा आहे. परंतु त्यासाठी एका देशानं दुस-या देशाशी चर्चा करण्याची गरज नाही. त्या देशाला बाजूला करून चर्चा होऊ शकत नाही. 

टॅग्स :Sushma Swarajसुषमा स्वराजPakistanपाकिस्तान