शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

सर्व्हे : इम्रान खान बनू शकतो पाकिस्तानचा पंतप्रधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2018 16:51 IST

पाकिस्तानमध्ये सध्या सार्वत्रिक निवडणुकीचा धामधूम सुरू असून, येत्या बुधवारी तेथे मतदान होणार आहे.

इस्लामाबाद - पाकिस्तानमध्ये सध्या सार्वत्रिक निवडणुकीचा धामधूम सुरू असून, येत्या बुधवारी तेथे मतदान होणार आहे. पाकिस्तानमध्ये अनेक पक्ष निवडणुकीच्या रिंगणात असले तरी मुख्य लढत तीन पक्षात होत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे शेजारील देश म्हणून भारताचेही या निवडणुकीवर बारीक लक्ष आहे. दरम्यान, पाकिस्तानमधील डॉन न्यूजने केलेल्या सर्व्हेनुसार पाकिस्तानमध्ये यावेळी माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांचा पक्ष सत्तेच येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. डॉन न्यूजने केलेल्या सर्व्हेनुसार 1997 पासून राजकारणात नशीब आजमावत असलेल्या इम्रान खानचे स्वप्न यावेळी पूर्ण होण्याची शक्यता आहे. या सर्वेमध्ये सर्वाधिक तरुणांचा समावेश होता. ज्यांचे वय 18 ते 44 च्या दरम्यान होते. तसेच इम्रान खानच्या पीटीआय या पक्षाच्या समर्थकांमध्ये बहुतकरून तरुणांचाच समावेश असल्याचेही समोर आले आहे.  पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकीत यावेळी शाहबाझ शरीफ ( पीएमएल -एन) इम्रान खान (पीटीआय) आणि बिलावल भुत्तो (पीपीपी) हे नेते रिंगणात आहेत. नवाझ शरीफ यांना पंतप्रधानपदावरून पायउतार व्हावे लागल्यानंतर सत्तासूत्रे हाती घेणाऱ्या शाहबाझ शरीफ यांनी आपल्या उत्तम प्रशासकीय कौशल्याची चुणूक दाखवली. मात्र त्यांचे नेतृत्व तितकेसे प्रभावी नाही. तर बिलावल भुत्तो राजकारणात नवखे आहेत. त्यामुळे इम्रान खान याचेच या निवडणुकीत पारडे जर राहण्याची शक्यता आहे.  सर्व्हेनुसार  2013 साली झालेल्या निवडणुकीत इम्रान खानच्या पक्षाला मतदान करणाऱ्या मतदारांपैकी 83.07 टक्के मतरादांनी यावेळी इम्रान खानचा पक्षच निवडणुकीत विजयी होईल, असे सांगितले. तर 2013 साली पीएमएल-एन या पक्षाला मत देणाऱ्या मतदारांपैकीही सुमारे 40.92 टक्के मतदारांनी यावेळी पीटीआयच निवडणुक जिंकेल असे सांगितले.  

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तानprime ministerपंतप्रधान