शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

हायड्रोक्सीक्लोरोक्वीन औषधाचा भारताकडून ५५ देशांना पुरवठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2020 23:35 IST

कोरोनावरील उपचारांसाठी उपयुक्त; निर्यातबंदी उठविल्यानंतर मागणी वाढली

नवी दिल्ली : कोरोना रुग्णांच्या उपचारांकरिता हायड्रोक्सीक्लोरोक्वीन हे औषध भारत अमेरिकेसह जगभरातील ५५ देशांना सध्या निर्यात करत आहे. मलेरियावरील उपचारांसाठी वापरले जाणारे हे औषध कोरोनाच्या निर्मूलनासाठीही उपयोगी आहे, असा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासहित अनेक लोकांचा दावा आहे. त्यामुळेही या औषधाला विविध देशांतून इतकी मागणी येत आहे.

भारताने पाठविलेला हायड्रोक्सीक्लोरोक्वीन औषधाचा साठा अमेरिका, मॉरिशस, सेशेल्स आदी देशांना याआधीच मिळाला आहे. तर बाकीच्या देशांना या औषधाचा पुरवठा चालू आठवड्याअखेरपर्यंत करण्यात येईल. हायड्रोक्सीक्लोरोक्वीन हे कोरोना रुग्णांवरील उपचारांसाठी प्रभावी औषध असल्याचे अमेरिकी अन्न व औषधे खात्याने म्हटले आहे. या औषधाचा प्रयोग न्यूयॉर्कमधील १५००हून अधिक रुग्णांवर करण्यात आला होता.कोरोनाची साथ पसरल्यानंतर देशात आवश्यक औषधांचा पुरेसा साठा कायम राखण्यासाठी हायड्रोक्सीक्लोरोक्वीनसह काही औषधांच्या निर्यातीवर मोदी सरकारने तात्पुरती बंदी घातली होती. त्यानंतर हायड्रोक्सीक्लोरोक्वीन औषध पाठवावे अशी विनंती ट्रम्प सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली होती. हे औषध अमेरिकेला न पाठविल्यास भारताला त्याचे परिणाम भोगावे लागतील अशीही धमकी ट्रम्प यांनी दिली. मात्र अशा धमक्यांना भीक न घालता भारताने सर्व स्थितीचा आढावा घेऊन औषधांवरील निर्यातबंदी काही दिवसांनी उठविली. भारत हा अफगाणिस्तान, भूतान, बांगलादेश, नेपाळ, मालदीव, श्रीलंका, म्यानमार आदी देशांनाही हायड्रोक्सीक्लोरोक्वीनचा साठा लवकरच पाठविणार आहे. पाकिस्तानने भारताकडे या औषधाची मागणी केली आहे की नाही, हे अद्याप कळू शकलेले नाही.रशिया, फ्रान्स आदींचाही समावेशभारताकडून हायड्रोक्सीक्लोरोक्वीन या औषधाचा पुरवठा होणार असलेल्या कोरोनाग्रस्त देशांमध्ये झांबिया, डॉमिनिकन रिपब्लिक, मादागास्कर, युगांडा, बुर्किना फासो, माली कोंगो, इजिप्त, अर्मेनिया, कझाकिस्तान, इक्वेडोर, युक्रेन, झिम्बाब्वे, फ्रान्स, जॉर्डन, केनिया, नेदरलँड्स, ओमान, पेरु , फिलिपिन्स, रशिया, स्लोव्हेनिया, दक्षिण आफ्रिका, संयुक्त अरब अमिरात (यूएइ) उझबेकिस्तान, उरुग्वे, कोलंबिया, अल्जेरिया बहामाज, ब्रिटनआदी देशांचाही समावेश आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतAmericaअमेरिका