शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सुपर स्मार्ट शहर, ना रस्ता आणि ना कार! सौदीत निओम शहर सौर-पवन ऊर्जेवर चालणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2023 08:41 IST

निओमचे सीईओ नदमी अल-नासर म्हणतात की येथे लागणारी विजेची गरज सौर आणि पवन ऊर्जेद्वारे भागवली जाईल.

दुबई : सौदी अरेबियाने आपली अर्थव्यवस्था इंधन आधारितवरून केव्हा पर्यटन आधारित केली हेही कोणाच्या लक्षात आले नाही. देशाचा संपूर्ण चेहरामोहराच मागील काही दशकांत बदलला आहे. जगभरातील पर्यटकांना आकर्षित करणारी प्रत्येक गोष्ट तेथे उभारण्यात आली आहे. आता त्यात पर्यावरणपूरक सुपर स्मार्ट सिटीची भर पडणार आहे, जेथे ना रस्ते असतील ना कार.

वायव्य सौदी अरेबियाच्या ताबूक प्रांतात बनवले जाणारे निओम ही सुपर स्मार्ट सिटी पूर्णपणे स्वच्छ ऊर्जेवर चालणार आहे. सुमारे ५०० अब्ज डॉलर्सच्या या शहरात रस्ते नाहीत, गाड्याही धावणार नाहीत. हे शून्य कार्बन उत्सर्जन असलेले शहर असेल. विशेष म्हणजे शहराचे २० टक्के काम पूर्णही झाले आहे. 

कायदेही वेगळेसध्याच्या शासकीय रचनेपासून शहर स्वतंत्रपणे काम करेल. त्याच्या स्वतःच्या कर आणि कामगार कायद्यांव्यतिरिक्त एक स्वायत्त न्यायिक प्रणाली असेल. शहरात बंदरे, एंटरप्राइझ झोन, संशोधन केंद्रे, पर्यटन, क्रीडा केंद्रे आणि अनेक मनोरंजन स्थळांसह निवासी क्षेत्रे असतील. 

आव्हाने सोडवणारअल-नासर म्हणतात की निओमच्या माध्यमातून, आम्ही मानवजातीसमोरील काही अत्यंत गंभीर आव्हाने सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत. निओम हा ग्रीक शब्द निओ (नवीन) आणि अरबी शब्द मुस्तकबिलचे (भविष्य) पहिले अक्षर यांचे मिश्रण आहे.

निओमचे सीईओ नदमी अल-नासर म्हणतात की येथे लागणारी विजेची गरज सौर आणि पवन ऊर्जेद्वारे भागवली जाईल. हायड्रोजनवर आधारित वीजनिर्मितीही होईल. लाल समुद्राच्या किनाऱ्यावरील या मेगासिटी प्रकल्पाची घोषणा ऑक्टोबर २०१७ मध्ये सौदीचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान यांनी रियाधमधील गुंतवणूक परिषदेत केली होती. सौदी अरेबियाने ‘व्हिजन २०३०’च्या माध्यमातून देशाच्या अर्थव्यवस्थेत आमूलाग्र परिवर्तन घडवून आणण्याची तयारी सुरू केली आहे. ‘व्हर्टिकल फार्मिंग’ आणि हरितगृहांचा वापर करून निओमला जगातील सर्वात मोठे अन्नस्वावलंबी शहर बनवू इच्छित आहे. सध्या, सौदी अरेबिया आपल्या अन्नधान्यांपैकी सुमारे ८० टक्के धान्य आयात करतो. 

टॅग्स :saudi arabiaसौदी अरेबिया