शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

पंजाबचा गँगस्टर सुखा दुनीकेची कॅनडात हत्या, हल्लेखोरांनी झाडल्या १५ गोळ्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2023 10:57 IST

सुखा दुनीके हा मोस्ट वॉन्टेड अर्श डल्ला गँगशी संबंधित होता.

पंजाबमधील मोगा जिल्ह्यातील दविंदर बंबीहा टोळीतील सुखदुल सिंग उर्फ ​​सुखा दुनीके याची बुधवारी (२० सप्टेंबर) रात्री कॅनडामध्ये हत्या करण्यात आली. हल्लेखोरांनी ​​सुखा दुनीके यांच्यावर जवळपास १५ गोळ्या झाडल्या. सुखा दुनीके हा मोस्ट वॉन्टेड अर्श डल्ला गँगशी संबंधित होता. तसेच, सुखा दुनीके हा टार्गेट किलिंगसाठी ओळखला जात होता. पंजाब, हरयाणा, दिल्ली आणि राजस्थानमध्ये दविंदर बंबीहा टोळीला मदत आणि निधी पुरवून तो मजबूत करत होता. 

रिपोर्टनुसार, सुखा दुनीकेचा कल खलिस्तान समर्थक संघटनांकडेही होता. मात्र, तो मुख्यतः इतरांना खंडणीसाठी बोलावत असे आणि कॉन्ट्रॅक्ट किलिंगमध्ये त्याचा सहभाग होता. तसेच, सुखा दुनीके आपल्या साथीदारांच्या मदतीने पंजाब आणि आसपासच्या राज्यात गुन्हे करत होता. गेल्या वर्षी १४ मार्च रोजी जालंधरच्या मल्ल्यान गावात कबड्डी सामन्यादरम्यान सुखा दुनीकेने कबड्डीपटू संदीप सिंग नांगल याचा साथीदारांच्या मदतीने हत्येचा कट रचला होता. त्याच्यावर पंजाब आणि शेजारील राज्यांमध्ये खून आणि इतर गंभीर गुन्ह्यांचे २० हून अधिक गुन्हे दाखल आहेत.

हिंदुस्तान टाईम्सला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, सुखा दुनीके २०१७ मध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतातून कॅनडाला पळून गेला होता. दरम्यान, पंजाब आणि आसपासच्या भागातील जवळपास २९ गँगस्टर आहेत, जे कायद्यापासून वाचण्यासाठी भारताबाहेर आश्रय घेत आहेत. ते अनेक वर्षांपूर्वी भारतीय पासपोर्टवर किंवा बनावट प्रवासी कागदपत्रांच्या सहाय्याने नेपाळमार्गे दुसऱ्या देशात गेले होते.

दुसरीकडे, खलिस्तानी दहशतवाद्यांविरुद्धची कारवाई तीव्र करत एनआयएने (NIA) काल म्हणजेच बुधवारी (२० सप्टेंबर) अर्श डल्ला टोळीवर १० लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते. याशिवाय, एनआयएने हरविंदर सिंग संधू उर्फ ​​रिंडा आणि लखबीर सिंग संधू उर्फ ​​लंडा यांच्यासह बब्बर खालसा इंटरनॅशनलच्या पाच कार्यकर्त्यांना अटक करण्याच्या माहितीसाठी रोख बक्षीस जाहीर केले होते.

टॅग्स :Canadaकॅनडाterroristदहशतवादी