शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

कोरोनामुळे आत्महत्या, चीनमध्ये भारतीय तरुणालाही मृत्यूने गाठले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2023 08:20 IST

तामिळनाडूतील अब्दुल शेख हा  २२ वर्षीय तरुण चीनमध्ये वैद्यकशास्त्राचे शिक्षण घेत होता. मृत्यूचे कारण काही आजार असल्याचे सांगितले जात असले तरी तो कोरोनाचा बळी ठरला असावा, असा अंदाज आहे.

बीजिंग : चीन सरकारने कोरोनाची स्थिती कितीही लपविण्याचा प्रयत्न केला तरी ती अनियंत्रित झाल्याचे हळूहळू स्पष्ट होत आहे. आता तर कोरोनामुळे चिनी नागरिक आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलताना दिसत आहेत. दरम्यान, एका भारतीय तरुणालाही कोरोनाने मृत्यूच्या दारात पोहोचवले आहे.

तामिळनाडूतील अब्दुल शेख हा  २२ वर्षीय तरुण चीनमध्ये वैद्यकशास्त्राचे शिक्षण घेत होता. मृत्यूचे कारण काही आजार असल्याचे सांगितले जात असले तरी तो कोरोनाचा बळी ठरला असावा, असा अंदाज आहे. त्याचा मृतदेह परत आणण्यासाठी कुटुंबीयांनी परराष्ट्र मंत्रालयाकडे मदत मागितली आहे.

आजारी पडल्यानंतर अब्दुलला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, त्याचा जीव वाचू शकला नाही. चिनी कम्युनिस्ट पक्षावर लक्ष ठेवणाऱ्या मानवाधिकार कार्यकर्त्या जेनिफर झेंग यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओत एक व्यक्ती इमारतीच्या छतावरून आत्महत्या करताना दिसत आहे. चीनमध्ये कोरोनामुळे लोक आत्महत्या करत असल्याचा झेंगचा दावा आहे.

हाँगकाँगचाही अजब निर्णयचीनमधील परिस्थिती आटोक्याबाहेर जात असताना हाँगकाँग ८ जानेवारीपासून चीनसोबतची सीमा उघडणार आहे. यासोबतच प्रवाशांसाठी अनिवार्य विलगीकरणही रद्द करण्यात येणार आहे. 

जगात ६६ कोटींवर बाधित कोरोना वर्ल्डोमीटरनुसार, जगात आतापर्यंत ६६ कोटी ५२ लाख ९ हजार ९६४ रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत ६६ लाख ९७ हजार ९२२ मृत्यू झाले आहेत.

५०० बळी ब्रिटनमध्ये आठवड्याला द गार्डियनच्या वृत्तानुसार, रॉयल कॉलेज ऑफ इमर्जन्सी मेडिसिनचे डॉ. एड्रियन बॉयल म्हणतात, की ब्रिटनमध्ये कोरोनामुळे दर आठवड्याला ३०० ते ५०० लोक मरत आहेत. वेळेवर उपचार न मिळाल्याने हा प्रकार घडत आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीन