ऑनलाइन लोकमत
दुबई, दि. २६ - कुवेतमधील कुवेती शिया मस्जिदवर आत्मघाती बॉम्बस्फोट घडविण्यात आला असून या स्फोटात २५ जणांचा मृत्यू झाल्याचे समजते, तर अनेक जण जखमी झाले आहे.
कुवेती शिया मस्जिदमध्ये अनेक मुस्लिमबांधव नमाज अदा करण्यासाठी आले असतानाच हा बॉम्बस्फोट घडविण्यात आला. या स्फोटात २५ जणांचा मृत्यू झाल्याचे येथील स्थानिक वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या माहितीनुसार समजते, तर अनेक जण जखमी झाले असून जखमींना येथील स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान, मश्जिदवर केलेल्या या बॉम्बस्फोटाची जबाबदारी इसिस या दहशतवादी संघटनेने स्विकारली आहे.