शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

पाच जणांच्या कुटुंबाने केला आत्मघाती हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 06:47 IST

इंडोनेशियातील दुसरे सर्वात मोठे शहर सुराबाया स्थित पोलीस मुख्यालयावर पाच जणांच्या एका कुटुंबाने आत्मघाती हल्ला केला.

सुराबाया : इंडोनेशियातील दुसरे सर्वात मोठे शहर सुराबाया स्थित पोलीस मुख्यालयावर पाच जणांच्या एका कुटुंबाने आत्मघाती हल्ला केला. यात एका मुलाचाही समावेश आहे. एका अन्य कुटुंबाने चर्चेवर केलेल्या हल्ल्याला काही तास उलटत नाहीत तोच हा दुसरा हल्ला झाल्याने इंडोनेशिया हादरले आहे.चर्चवरील हल्ल्यांची जबाबदारी इसिसने घेतली आहे. यामुळे या संघटनेचा दक्षिणपूर्व आशियात प्रभाव वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. आगामी तीन महिन्यात इंडोनेशियात आशियाई क्रीडा स्पर्धा होणार आहेत.या देशावर दीर्घ काळापासून अतिरेक्यांचा प्रभाव राहिलेला आहे. २००२ मध्ये बालीमध्ये झालेल्या बॉम्ब हल्ल्यात २०० जण मृत्युमुखी पडले होते. यात बहुतांश विदेशी पर्यटक होते. त्यानंतर सुरक्षा दलाने अतिरेक्यांविरुद्ध मोहिम उघडली होती. शेकडो अतिरेक्यांना अटक केली होती. अनेक अतिरेकी नेटवर्क उद्ध्वस्त केले होते. अलीकडच्या हल्ल्यात सुरक्षा दलांना लक्ष्य करण्यात आले आहे. मात्र, रविवारी दोन मुलांसह सहा जणांच्या एका कुटुंबाने सुराबायामध्ये सकाळच्या प्रार्थनेनंतर चर्चवर आत्मघातकी हल्ला केला. यात हल्लेखोरांसह १८ जण मारले गेले. चर्चवरील हल्ल्याची जबाबदारी इसिसने स्वीकारली आहे. या हल्ल्यात सहभागी व्यक्ती जेएडीचा स्थानिक नेता आहे. हा समूह इसिसचा समर्थक आहे. दुसरे आत्मघाती कुटुंबही या समूहाशी जोडलेले आहे. कार्नावियान म्हणाले की, जेएडीच्या नेतृत्वाला झालेली अटक हे हल्ल्याचे कारण असू शकते. (वृत्तसंस्था)।नेमके काय झाले?येथे सोमवारी एका अन्य कुटुंबाने शहरातील पोलीस ठाण्याच्या परिसरात स्वत:ला उडवून दिले. यात १० जखमी झाले आहेत. राष्ट्रीय पोलीस प्रमुख टीटो कार्नावियान म्हणाले की, दोन दुचाकींवर पाच लोक आले होते. यात एक लहान मुलगाही होता.या हल्लेखोर कुटुंबातील एक ८ वर्षांची मुलगी बचावली. तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे, पण तिची आई, वडील आणि दोन भाऊ यांचा मृत्यू झाला.

टॅग्स :Terror Attackदहशतवादी हल्लाTerrorismदहशतवाद