शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
2
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
3
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
4
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
5
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
6
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
7
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
8
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
9
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
10
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
11
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
12
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
13
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
14
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
15
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
16
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
17
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
18
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
19
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
20
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!

..... आणि दुर्दम्य इच्छा शक्तीचे पंख लावून सूर्यकिरण विमाने पुन्हा झेपावली आकाशाकडे... 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2019 4:48 PM

एअरो इंडिया २०१९ च्या उद्घाटन समारंभासाठी सराव करत असताना सूर्यकिरण विमानाची धडक झाल्याने दोन विमाने कोसळली होती.

ठळक मुद्देएअर शोमध्ये सहभाग : विंग कमांडर साहिल गांधी यांना वाहिली आदरांजली डायमंड फॉर्मेशन सादर करताना साहिल गांधी यांच्या विमानाची जागा रिकामी ठेवत त्यांना आदरांजली

- निनाद देशमुख - बेंगळूरू :  एअरो इंडिया २०१९ च्या उद्घाटन समारंभासाठी सराव करत असताना सूर्यकिरण विमानाची धडक झाल्याने दोन विमाने कोसळली होती.  या दुर्घटनेत विंग कमांडर साहिल गांधी यांचा मृत्यू झाला होता. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सूर्यकिरण एरोबॅटिक पथकाने शनिवारी झालेल्या एअर शो मध्ये सहभागी होत पुन्हा आकाशात भरारी घेतली. यावेळी साहिल याच्या विमानाची जागा रिकामी ठेवत त्यांना मानवंदना देण्यात आली.बेंगळूरू येथील एलहांका विमानतरळावर एअरो इंडिया २०१९ चे आयोजन करण्यात आले आहे. पाच दिवस चाणा-या या प्रदर्शनाच्या उदघाटनासाठी सूर्यकिरण एरोबॅटीक टीम सराव करत होती. सरावा दरम्यान मिरर फोरर्मेशन करताना दोन विमाने एकमेकाना धडकल्याने ती कोसळली. यावेळी विंग कमांडर साहिल गांधी यांना वेळीच विमाना बाहेर पडता न आल्याने त्यांचा मृत्यू झाला तर दुसऱ्या विमानातील विंग कमांडर विजय शेळके आणि विंग कमांडर तेजस्वर सिंग हे पॅराशुटच्या साह्याने बाहेर पडले असले तरी ते गंभीर जखमी झाले होते.  यामुळे उद्घाटन सोहळ्यादरम्यान होणारी सूर्यकिरण विमानांची प्रात्यक्षिके रद्द करण्यात आली होती. तसेच या पुढे या विमानाचे उड्डाण होणार की नाही याबाबतही शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या. मात्र, शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या एअर शो मध्ये सूर्यकिरण विमानांनी सहभाग घेत पुन्हा उड्डाण केले. यावेळी मोजक्याच कवायती या पथकाने सादर केल्या. डायमंड फॉर्मेशन सादर करत यातील साहिल गांधी यांच्या विमानाची जागा रिकामी ठेवत साहिल याना आदरांजली वाहण्यात  आली. या पथकात ९ विमानांचा समावेश असायचा मात्र अपघातात दोन विमाने नष्ट झाल्यामुळे ७ विमानाच्या पथकाने ही प्रात्यक्षिके सादर केली.

टॅग्स :BengaluruबेंगळूरIndian Armyभारतीय जवानindian air forceभारतीय हवाई दल