शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

सुदानमध्ये परिस्थिती बिघडली; तिथे अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी 'ऑपरेशन कावेरी'ला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2023 17:42 IST

आफ्रिकन देश सुदानमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून लष्कर आणि निमलष्करी दल यांच्यात भीषण युद्ध सुरू आहे.

Sudan Civil War: आफ्रिकन देश सुदानमध्ये गृहयुद्ध सुरू आहे. संकटग्रस्त सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी भारत सरकारने 'ऑपरेशन कावेरी' सुरू केले आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ट्विट करुन याची माहिती दिली. 'ऑपरेशन कावेरी सुरू करण्यात आले आहे. या मोहिमेअंतर्गत सुमारे 500 भारतीय सुदानच्या बंदरांवर पोहोचले आहेत. त्यांना मायदेशी आणण्यासाठी जहाजे आणि विमाने सज्ज आहेत. आम्ही सुदानमधील आमच्या सर्व बांधवांना मदत करण्यास वचनबद्ध आहोत,' असे ट्विट त्यांनी केले..

सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी हवाई दलाची दोन सी-130 विमाने आणि नौदलाचे आयएनएस सुमेधा जहाज सौदी अरेबिया आणि सुदानला पोहोचले आहेत. सौदी अरेबियातील जेद्दाह येथे हवाई दलाची जहाजे तैनात आहेत, तर आयएनएस सुमेधा सुदानच्या बंदरात पोहोचली आहे.

सुदानमध्ये काय सुरू आहे?

सुदानमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून लष्कर आणि निमलष्करी दल यांच्यात भीषण युद्ध सुरू आहे. लष्कराविरुद्ध युद्ध करणाऱ्या निमलष्करी दलाला येथे रॅपिड सपोर्ट फोर्स (RSF) म्हणून ओळखले जाते. लष्कर आणि आरएसएफ यांच्यात सुरू झालेल्या युद्धात येथील सामान्य नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. राजधानी खार्तूममध्ये सर्वात वाईट परिस्थिती आहे. विमानतळ, स्थानकासह सर्व महत्त्वाच्या जागा ताब्यात घेण्यासाठी लढा सुरू आहे.

भारतीयांना बाहेर काढणे का कठीण?सुदानमध्ये सुमारे 4 हजार भारतीय आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बहुतांश भारतीय चार शहरांमध्ये स्थायिक आहेत. यापैकी एक ओमदुरमन, दुसरा कसाला, तिसरा गेदारेफ किंवा अल कादरिफ, तर चौथ्या शहराचे नाव वड मदनी आहे. यापैकी दोन शहरांचे अंतर राजधानी खार्तूमपासून 400 किलोमीटरपेक्षा जास्त आहे, तर एका शहराचे अंतर सुमारे 200 किलोमीटर आहे. 

एक शहर राजधानीला लागून आहे आणि खार्तूमपासून त्याचे अंतर फक्त 25 किमी आहे. सर्वात चिंतेची बाब म्हणजे या चार शहरांपैकी एकाही शहरात आंतरराष्ट्रीय विमानतळ नाही. सुदानमध्ये फक्त दोन आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत. एक राजधानी खार्तूममध्ये आहे आणि दुसरे पोर्ट सुदानमध्ये आहे. मात्र, हवाई हल्ल्याच्या वेळी इथून लोकांना बाहेर काढणेही अवघड आहे. त्यामुळे सध्या जहाजांची मदत घेतली जात आहे.

सुदानमध्ये युद्ध का सुरू आहे?आफ्रिकन देश सुदानमध्ये लष्कराचे कमांडर जनरल अब्देल-फताह बुरहान आणि निमलष्करी दलाचे प्रमुख जनरल मोहम्मद हमदान डगालो यांच्यात संघर्ष सुरू आहे. जनरल बुरहान आणि जनरल डगालो हे दोघेही आधी एकत्र होते. सध्याच्या संघर्षाची मुळे एप्रिल 2019 मध्ये जातात. त्यावेळी सुदानचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष ओमर अल-बशीर यांच्याविरोधात जनतेने उठाव केला होता. नंतर लष्कराने अल-बशीरची सत्ता उलथून टाकली. बशीर यांना सत्तेवरून हटवल्यानंतरही बंडखोरी थांबली नाही. नंतर लष्कर आणि आंदोलकांमध्ये सामंजस्य करार झाला. करारानुसार, एक सार्वभौमत्व परिषद स्थापन करण्यात आली आणि 2023 च्या अखेरीस निवडणुका होतील असा निर्णय घेण्यात आला. त्याच वर्षी अब्दल्ला हमडोक यांची पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली. मात्र हेही कामी आले नाही. ऑक्टोबर 2021 मध्ये लष्कराने सत्तापालट केला. जनरल बुरहान परिषदेचे अध्यक्ष आणि जनरल डगालो उपाध्यक्ष झाले.

युद्ध कशासाठी झाले?जनरल बुरहान आणि जनरल डगालो एकेकाळी एकत्र होते, पण आता दोघेही एकमेकांच्या विरोधात गेले आहेत. याचे कारण म्हणजे दोघांमधली दुरावा. वृत्तसंस्थेनुसार, सुदानमध्ये निवडणुका घेण्याबाबत दोघांमध्ये एकमत होऊ शकले नाही. याशिवाय असे देखील बोलले जात आहे की, लष्कराने एक प्रस्ताव ठेवला होता, ज्या अंतर्गत 10,000 आरएसएफ सैनिकांना सैन्यात सामील करण्याची चर्चा होती. पण त्यानंतर निमलष्करी दलाचे लष्करात विलीनीकरण झाल्यानंतर तयार होणाऱ्या नव्या दलाचे प्रमुख कोण असेल, असा प्रश्न निर्माण झाला. गेल्या काही आठवड्यांपासून देशाच्या विविध भागांमध्ये निमलष्करी दलांची तैनाती वाढली होती, याला लष्कराने चिथावणीखोर आणि धमकी म्हणून पाहिले होते. यानंतर गृहयुद्ध सुरू झाले.

 

टॅग्स :IndiaभारतInternationalआंतरराष्ट्रीयindian air forceभारतीय हवाई दलindian navyभारतीय नौदलS. Jaishankarएस. जयशंकर