शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

आडमुठेपणा! भारतीय खलाशी असलेल्या जहाजांना चीनमध्ये प्रवेश नाही; कोट्यवधीचा व्यापार ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2021 09:15 IST

शिपिंग कंपन्यांसह २ लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांपुढे पेच

सुहास शेलार

मुंबई : कोरोना विषाणूचा जनक असलेल्या चीनने पुन्हा एकदा भारताविरोधात मोहीम उघडली आहे. भारतीय खलाशी असलेल्या जहाजांना प्रवेश न देण्याचे फर्मान चिनी सरकारने काढल्यामुळे कोट्यवधींचा व्यापार ठप्प झाल्याची माहिती एका शिपिंग कंपनीशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. चीनच्या या आडमुठेपणामुळे शिपिंग कंपन्यांसह २ लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांसमोर पेच निर्माण झाला आहे.

लसीकरण पूर्ण न झाल्याने आधीच भारतीय खलाशांना परदेशी जहाजावर घेतले जात नाही. तर जे खलाशी दुसऱ्या लाटेआधी रुजू झाले त्यांच्यासमोर चीनने अडचणी निर्माण केल्या आहेत. ज्या भारतीय खलाशाचे लसीकरण पूर्ण झालेले नसेल, त्यांना चीनमध्ये प्रवेश न देण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. असे खलाशी आढळल्यास जहाजाला चीनमधील कोणत्याही बंदरावर प्रवेश दिला जात नसल्याने शिपिंग कंपन्यांसमोर पेच निर्माण झाला आहे. यामुळे कोट्यवधींचा व्यापार ठप्प होण्याबरोबरच भारतीय खलाशांच्या रोजगारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची माहिती ऑल इंडिया सिफेरर्स युनियनचे कार्याध्यक्ष अभिजित सांगळे यांनी दिली.

दुसऱ्या लाटेआधी जहाजांवर रुजू झालेल्या बहुतांश भारतीय खलाशांचे लसीकरण झालेले नाही. परंतु, हे खलाशी जहाजावरील कर्मचाऱ्यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणाच्याही संपर्कात आलेले नाहीत. त्याच जहाजावर असलेल्या अन्य देशांतील खलाशांना लसीकरणाची अट चीनने घातलेली नाही. त्यामुळे भारताची व्यापारकोंडी करण्याचा हा प्रयत्न तर नाही ना, अशी शंका सांगळे यांनी व्यक्त केली.

अशी होते अडवणूक... सागरी व्यापार क्षेत्रात सेवा देणाऱ्या भारतीय खलाशांची संख्या सर्वाधिक म्हणजे ८० टक्के इतकी असली तरी जागतिक बाजारपेठेवर चीनची हुकूमत आहे. कच्च्या किंवा तयार मालाच्या वाहतुकीच्या माध्यमातून शिपिंग कंपन्यांना सर्वाधिक व्यवसाय तेथूनच मिळतो. त्यामुळे चिनी सरकाच्या आदेशाचे पालन केल्यावाचून कंपन्यांसमोर पर्याय नाही. त्यामुळे बहुतांश कंपन्यांनी भारतीय खलाशांची चीनमधील सेवा स्थगित केली आहे. काहींनी तर त्यांना पुन्हा मायदेशी पाठविण्यास सुरुवात केली असून, नव्याने रुजू होणाऱ्यांना काही महिने वाट पाहण्याचा सल्ला दिला आहे.

चीनच्या या आडमुठ्या धोरणाविरोधात आम्ही डी.जी. शिपिंग, नौवहनमंत्री, तसेच परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडे तक्रार दाखल केली आहे. संबंधित यंत्रणांनी या प्रकरणाची तत्काळ दखल घेऊन तोडगा काढावा. अन्यथा भारतीय खलाशांना नोकऱ्या गमावाव्या लागतीलच, शिवाय सागरी व्यापार क्षेत्रातील आपले महत्त्व कमी होईल. - अभिजित सांगळे, कार्याध्यक्ष, ऑल इंडिया सिफेरर्स युनियन

टॅग्स :chinaचीनIndiaभारत