शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
2
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
3
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
4
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
5
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
6
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
7
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
8
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
9
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
10
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
11
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
12
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
13
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
14
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
15
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
16
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
17
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
18
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
19
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
20
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला

अन्नपाण्यासाठी संघर्ष; ३ लाख लोकांचे स्थलांतर; संयुक्त राष्ट्राकडून चिंता; इस्रायलचा गाझावर हल्ला तीव्र 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2023 07:55 IST

जीवाच्या भीतीने जवळपास ३ लाख नागरिकांनी गाझातून स्थलांतर केल्याचे संयुक्त राष्ट्राच्या अहवालात म्हटले आहे.

जेरूसलेम : हमासने केलेल्या हल्ल्यानंतर इस्रायलकडून गाझापट्टीवर जोरदार हल्ले केले जात आहे. पॅलेस्टाइनला धडा शिकविण्यासाठी इस्रायलने नाकाबंदी केली असून त्यामुळे गाझामध्ये वीज, अन्नधान्य, जेवण, पाण्यासह जीवनावश्यक गोष्टींचा तुटवडा जाणवत आहे. त्यासाठी लोकांच्या रांगा लागत आहे. जीवाच्या भीतीने जवळपास ३ लाख नागरिकांनी गाझातून स्थलांतर केल्याचे संयुक्त राष्ट्राच्या अहवालात म्हटले आहे.

हमासच्या दहशतवाद्यांचा बीमोड करण्यासाठी इस्रायलमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांनी अनेक वर्षांचा कटू संघर्ष विसरून ऐक्य सरकार स्थापन करून नेतन्याहू यांना पाठिंबा दिला आहे. केवळ युद्धाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या मंत्रिमंडळाचे नेतृत्व नेतन्याहू करतील.

१५ मुलींना एकत्र कोंडले अन्...हमासच्या दहशतवाद्यांनी लोकांचे गळे कापले, मुलांना रांगेत उभे करून ठार मारले आणि १५ मुलींना एका खोलीत बंद करून तेथे ग्रेनेड फेकल्याचे इस्रायलचे मेजर जनरल इताई वेरूव यांनी सांगितले. 

सहाव्या दिवशी काय घडले?- इस्रायलला राफाह येथून मदत आणि इंधनपुरवठ्याची रसद जाऊ देण्यासाठी इजिप्तची इस्रायल आणि अमेरिकेशी चर्चा झाली. तथापि, गाझाबाहेर कॉरिडॉर स्थापन करण्याच्या प्रस्तावांना इजिप्तने नकार दिला आहे.- मलेशियाचे परराष्ट्रमंत्री झांब्री अब्दुल कादिर यांनी इस्रायलच्या प्रतिहल्ल्याचा तीव्र निषेध केला आणि पॅलेस्टिनींना २.१२ लाख डॉलरची मदत जाहीर केली.- ‘एक्स’ प्लॅटफॉर्मवर हमासशी संबंधित शेकडो खाती बंद करण्यात आली आहेत.

बायडेन यांच्यामुळे युद्धराष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या परराष्ट्र धोरणांमुळे जग युद्ध पाहत आहे, ज्यात आतापर्यंत २३०० बळी गेले आहेत. बायडेन प्रशासनानेच हमासचा समर्थक असलेल्या इराणची सुमारे ६ अब्ज डॉलर्सची गोठवलेली मालमत्ता मुक्त केली.    - डोनाल्ड ट्रम्प, माजी राष्ट्राध्यक्ष, अमेरिका

हमासचा हल्ला सर्वांत प्राणघातकहमासचा इस्रायलवरील दहशतवादी हल्ला होलोकॉस्टनंतर ज्यूंसाठी ‘सर्वांत प्राणघातक दिवस’ आहे. अमेरिका इस्रायलमधील परिस्थितीवर सतत बारकाईने लक्ष ठेवून आहे. हमाससारखे दहशतवादी गट जगासमोर केवळ दहशतच आणत नाहीत, तर केवळ वाईट गोष्टी आणतात.     - जो बायडेन, राष्ट्राध्यक्ष, अमेरिका

टॅग्स :Israel-Hamas warइस्रायल - हमास युद्धIsrael Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षIsraelइस्रायल