शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

अफगाणिस्तानच्या पूर्व भागात रात्री ६ रिक्टर स्केल क्षमतेचा तीव्र भूकंप; ८०० लोकांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 06:08 IST

२,५०० पेक्षा अधिक जखमी, भारताने पाठविले १ हजार तंबू अन् १५ टन धान्य

काबूल: अफगाणिस्तानच्या पूर्व भागात रविवारी रात्री झालेल्या ६ रिक्टर स्केल क्षमतेच्या तीव्र भूकंपामुळे तेथील अनेक गावे जमीनदोस्त झाली असून, ८०० लोकांचा मृत्यू झाला तर २,५०० पेक्षा अधिक जखमी झाले आहेत. ही माहिती तालिबान सरकारने सोमवारी दिली. मृत, जखमींची संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

या देशातील कुनार प्रांतात हा भूकंप झाला. अमेरिकेच्या भूगर्भ सर्वेक्षण संस्थेनुसार, रविवारी रात्री ११:४७ वाजता आलेल्या भूकंपाचे केंद्र जलालाबाद शहराच्या ईशान्येस २७ किलोमीटर दूर, तसेच जमिनीखाली ८ किलोमीटर खोलवर होते. ज्या भूकंपाचे केंद्र कमी खोलीवर असते, ते सहसा मोठे नुकसान करतात. रविवारी या भूकंपानंतरही अनेक वेळा धक्के बसले. या भीषण नैसर्गिक संकटाच्या तडाख्यामुळे कुनार प्रांतातील अनेक गावांतील इमारती कोसळल्या, त्याच्या ढिगाऱ्याखाली लोक गाडले गेले.

भारताने पाठविले १ हजार तंबू, १५ टन धान्य

१. भारताने भूकंपग्रस्त अफगाणिस्तानमध्ये तातडीने १ हजार तंबू, १५ टन अन्नधान्य, अन्य अत्यावश्यक गोष्टींची मदत पाठविली आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी ही माहिती दिली.२. तालिबान शासनाला औपचारिक मान्यता दिली नसतानाही, भारताने मानवतेच्या दृष्टिकोनातून ही मदत पाठविली आहे. आणखी मदत पाठविण्याची तयारी दर्शविली.

२०२३च्या भूकंपात ४ हजार जणांचा मृत्यू

७ ऑक्टोबर २०२३ रोजी अफगाणिस्तानमध्ये ६.३ रिक्टर स्केल क्षमतेचा भूकंप झाला होता. त्यावेळी ४,००० लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा तालिबान सरकारने केला होता. मात्र, संयुक्त राष्ट्रांनी दिलेल्या आकडेवारीनुसार मृतांची संख्या १,५०० होती. हा भूकंप गेल्या दोन-तीन वर्षांच्या कालावधीतील सर्वात विनाशकारी नैसर्गिक आपत्ती होती.

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानEarthquakeभूकंप