शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

‘काश्मिरींच्या पाठीशी उभे राहणे हा जिहादच’

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 04:36 IST

काश्मिरी जनतेच्या पाठीशी उभे राहणे हे जिहाद केल्यासारखेच आहे आणि जगाने जरी पाठ फिरविली तरी पाकिस्तान काश्मिरींना कायम पाठिंबा देतच राहील

इस्लामाबाद : काश्मिरी जनतेच्या पाठीशी उभे राहणे हे जिहाद केल्यासारखेच आहे आणि जगाने जरी पाठ फिरविली तरी पाकिस्तान काश्मिरींना कायम पाठिंबा देतच राहील, अशी दर्पोक्ती पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केली आहे.संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला उपस्थित राहण्यासाठी ते अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते. तेथून रविवारी पाकिस्तानला परतल्यानंतर इस्लामाबाद विमानतळाच्या बाहेर आपल्या पक्षकार्यकर्त्यांसमोर केलेल्या भाषणात त्यांनी हे उद्गार काढले. इम्रान खान यांनी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत शुक्रवारी केलेल्या भाषणात काश्मीरचा मुद्दा प्रामुख्याने मांडला होता. प्रत्येक देशाच्या प्रमुखाला आमसभेत भाषण करण्यासाठी १५ मिनिटांचा कालावधी देण्यात येतो. मात्र, इम्रान खान यांनी सुमारे ५० मिनिटे भाषण केले. त्यांच्या भाषणाचा अर्धा भाग हा काश्मीरशी संबंधित मुद्यांनीच व्यापलेला होता. ते म्हणाले होते की, काश्मीरमधील राजकीय बंद्यांची त्वरित मुक्तता करण्यात यावी.इम्रान खान म्हणाले की, काश्मिरी लोकांसाठी पाकिस्तान लढत राहणार आहे. सध्याचा काळ आपल्याला अनुकूल नसल्याने दु:खी व्हायचे काहीही कारण नाही. पाकिस्तानी लोकांचा पाठिंबा मिळाला तर काश्मिरी नक्की विजयी होतील.

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीर