शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

श्रीदेवींचे पार्थिव आज भारतात आणणार, दुबई पोलिसांनी अखेर दिली परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2018 15:24 IST

प्रख्यात अभिनेत्री श्रीदेवी यांचे पार्थिव भारतात नेण्यास दुबई पोलिसांनी अखेर परवानगी दिली आहे. या संदर्भात दुबई पोलिसांनी भारतीय दुतावासाला पत्र पाठवले असून,  पोलिसांच्या परवानगीनंतर श्रीदेवी यांचे पार्थिव आता...

दुबई - प्रख्यात अभिनेत्री श्रीदेवी यांचे पार्थिव भारतात नेण्यास दुबई पोलिसांनी अखेर परवानगी दिली आहे. या संदर्भात दुबई पोलिसांनी भारतीय दुतावासाला पत्र पाठवले असून,  पोलिसांच्या परवानगीनंतर श्रीदेवी यांचे पार्थिव आता आज भारतात आणले जाणार आहे,  श्रीदेवींच्या कुटुंबीयांनाही भारतात परतण्याची परवानगी देण्यात आली आहे. 

दुबई पोलिसांच्या परवानगीवनंतर श्रीदेवी यांचे पार्थिव भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.  त्यासाठी श्रीदेवी यांचे पार्थिव लेपनासाठी नेण्यात येणार आहे. या प्रक्रियेसाठी तासभराचा अवधी लागू शकतो. त्यानंतर इतर औपचारिकता पूर्ण करून श्रीदेवींचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात येईल. प्रथमत: श्रीदेवींचे पार्थिव त्यांच्या दुबईमधील कुटुंबीयांच्या घरी नेण्यात येणार असून, नंतर पार्थिव विमानातून भारतात आणले जाईल, असे सांगण्यात येत आहे. 

जुमैरा एमिरेट्स टॉवर या हॉटेलच्या रुम नंबर 2201 मध्ये शनिवारी रात्री श्रीदेवी बेशुद्धावस्थेत सापडल्या होत्या.  श्रीदेवींचा मृत्यू  झाल्यानंतर त्यांचा हृदयक्रिया बंद पडल्याने मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत होते. मात्र पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये त्यांच्या मृत्यू तोल गेल्याने बाथटबमध्ये पडून झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर मृत्यूचे गुढ वाढल्याने दुबई पोलिसांनी या प्रकरणी कसून चौकशी करण्यास सुरुवात केली होती. 

दुबई पोलिसांनी श्रीदेवीचे पती बोनी कपूर आणि हॉटेल स्टाफची चौकशी केली होती. तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत बोनी कपूर यांना दुबई सोडता येणार नसल्याचेही सांगितले होते. अखेर आज दुपारी बोनी कपूर यांना भारतात परतण्यास परवानगी देण्यात आली. श्रीदेवींचे पार्थिव जरी भारतात नेण्यास परवानगी देण्यात आली असली तरी या प्रकरणाची चौकशी सुरू राहणार असल्याचे दुबई पोलिसांनी म्हटले आहे. 

दरम्यान,  संशयाचे दाट धुके निर्माण झाल्यामुळे श्रीदेवी यांच्या मृतदेहाचे आणखी एकदा शवविच्छेदन होऊ शकते असे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित झाले होते. त्यामुळे श्रीदेवींचा मृतदेह भारतात आणण्यास उशीर होऊ शकतो, असा अंदाज वर्तवण्यात येत होता. 

 

टॅग्स :Srideviश्रीदेवीbollywoodबॉलिवूड