शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

श्रीलंकेच्या बडतर्फ पंतप्रधानांना संसदेच्या अध्यक्षांकडून पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2018 05:18 IST

राष्ट्राध्यक्षांनी बडतर्फ केलेले पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे यांच्या पाठीशी श्रीलंकेच्या संसदेचे अध्यक्ष कारू जयसूर्या उभे राहिल्याने भारताच्या दक्षिणेकडील शेजारी देशात दोन दिवसांपूर्वी सुरू झालेल्या घटनात्मक पेचप्रसंगात नवी भर पडली.

कोलंबो : राष्ट्राध्यक्षांनी बडतर्फ केलेले पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे यांच्या पाठीशी श्रीलंकेच्या संसदेचे अध्यक्ष कारू जयसूर्या उभे राहिल्याने भारताच्या दक्षिणेकडील शेजारी देशात दोन दिवसांपूर्वी सुरू झालेल्या घटनात्मक पेचप्रसंगात नवी भर पडली. संसदेच्या अध्यक्षांनी बडतर्फ पंतप्रधानांनाच पंतप्रधान म्हणून मान्यता दिली, एवढेच नव्हे तर संसद येत्या १६ नोव्हेंबरपर्यंत निलंबित ठेवण्याचा राष्ट्राध्यक्ष मैत्रीपाल सिरिसेना यांचा निर्णयही चुकीचा असल्याचे म्हटले.राष्ट्राध्यक्ष सिरिसेना यांनी शुक्रवारी पंतप्रधान विक्रमसिंघे यांना बडतर्फ करून त्यांच्या जागी माजी राष्ट्राध्यक्ष महिंदा राजपक्षे यांना नेमले. आपल्याकडे अजूनही बहुमत असल्याने राजपक्षे यांची नेमणूक व शपथविधी घटनाबाह्य आहे, असा दावा विक्रमसिंघे यांनी केला.श्रीलंकेत लोकशाही मूल्ये आणि संवैधानिक प्रक्रियांचा आदर केला जाईल, अशी अपेक्षा भारताने रविवारी व्यक्त केली. तेथे झपाट्याने बदलणाऱ्या राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया देताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार म्हणाले की, श्रीलंकेतील घटनांवर भारत बारकाईने लक्ष ठेवून आहे. तेथे लोकशाही मूल्यांची बूज राखली जाईल, अशी एक शेजारी व लोकशाही देश म्हणून भारताची अपेक्षा आहे. श्रीलंकेतील विकासकामांना भारताकडून यापुढेही मदत देणे सुरू राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Sri Lankaश्रीलंका