शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

श्रीलंकेमध्ये सर्वपक्षीय हंगामी सरकार स्थापनेस विराेधक तयार; शांतता राखण्याचं लष्करप्रमुखांचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2022 11:55 IST

Sri Lanka Crisis : हजारो निदर्शकांनी राष्ट्राध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी करत त्यांच्या शासकीय निवासस्थानाचा शनिवारी ताबा घेतला. श्रीलंका गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.

कोलंबो - श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोताबाया राजपक्षे यांनी आपल्या पदावरून येत्या बुधवारी, १३ जुलै रोजी पायउतार होण्याची तयारी दर्शविली आहे. त्या देशात सर्वपक्षीय हंगामी सरकार बनविण्यास तेथील विरोधी पक्षांनी होकार दिला आहे. श्रीलंकेत निर्माण झालेला राजकीय पेचप्रसंग शांततापूर्ण मार्गाने सोडविण्याची संधी आता उपलब्ध झाली आहे. त्यामुळे जनतेने शांतता राखावी, असे आवाहन त्या देशाचे लष्करप्रमुख जनरल शावेंद्र सिल्वा यांनी केले आहे.

हजारो निदर्शकांनी राष्ट्राध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी करत त्यांच्या शासकीय निवासस्थानाचा शनिवारी ताबा घेतला. श्रीलंका गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. राजीनामा देण्याच्या मागणीकडे गोताबाया राजपक्षे यांनी आजवर दुर्लक्ष केले होते. मात्र, लोकांच्या असंतोषाचा शनिवारी पुन्हा भडका उडाल्यानंतर राजपक्षे यांनी बुधवारी राजीनामा देण्याची तयारी दर्शविली आहे. श्रीलंकेचे लष्करप्रमुख सिल्वा यांनी म्हटले आहे की, देशात शांतता कायम राहण्यासाठी जनतेने लष्कर व पोलिसांना सहकार्य करावे. राष्ट्राध्यक्ष गोताबाया यांच्या शासकीय निवासस्थानी निदर्शक रविवारीही ठिय्या मांडून बसले होते. 

राष्ट्राध्यक्षांच्या घरात लाखो रुपयांचे घबाड

राष्ट्राध्यक्ष गोताबाया राजपक्षे यांच्या शासकीय निवासस्थानी लाखो रुपयांचे घबाड मिळाल्याचा दावा निदर्शकांनी केला आहे. या निवासस्थानाचा ताबा घेतलेले निदर्शक तिथे सापडलेल्या नोटा मोजत असतानाचा व्हिडिओ समाजमाध्यमावर झळकला आहे. हे सर्व पैसे सुरक्षा दलाच्या हाती सोपविण्यात आले आहेत. गोताबाया राजपक्षे यांनी आपल्या शासकीय निवासस्थानी लाखो रुपये का जमा करून ठेवले होते असा सवाल निदर्शक विचारत आहेत.

 

टॅग्स :Sri Lankaश्रीलंका