शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार १५ नोव्हेंबर ते ७ डिसेंबरदरम्यान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2019 03:32 IST

निवडणूक आयोग; सिरिसेनांची मुदत ८ जानेवारीला संपणार

कोलंबो : श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक येत्या १५ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर या कालावधीदरम्यान होणार आहे. तशी घोषणा त्या देशाच्या निवडणूक आयोगाचे अध्यक्ष महिंदा देशप्रिया यांनी केली. मावळत्या राष्ट्राध्यक्षांची मुदत संपण्याच्या एक महिनाआधी त्या पदासाठी निवडणूक व्हावी अशी तरतूद श्रीलंकेच्या राज्यघटनेमध्ये असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

राष्ट्राध्यक्षपदासाठी ७ डिसेंबर रोजी निवडणूक होणार असल्याची माहिती श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष मैत्रीपाला सिरिसेना यांनी दिल्ली येथे गेल्या आठवड्यात दिली होती. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीला उपस्थित राहण्यासाठी आले होते. सिरिसेना यांची पाच वर्षांची मुदत पुढील वर्षी ८ जानेवारीला संपत आहे.

मतदार दिनानिमित्त श्रीलंकेतील मोरातुवा येथे झालेल्या समारंभात निवडणूक आयोगाचे अध्यक्ष महिंदा देशप्रिया म्हणाले की, १० नोव्हेंबरला रविवार आहे. बौद्धधर्मीयांसाठी पवित्र असलेला पोया दिन १२ नोव्हेंबर रोजी आहे. त्यामुळे राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक १५ नोव्हेंबरलाही होऊ शकते. ही निवडणूक ७ डिसेंबरच्या आत घेणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

श्रीलंकेचे तत्कालीन अध्यक्ष महिंदा राजपक्षे यांनी आपली या पदावरील कारकीर्द संपण्याच्या दोन वर्षे आधीच मध्यावधी निवडणूक जाहीर केली होती. त्या निवडणुकीत सिरिसेना विजयी झाले होते. त्यांची ८ जानेवारी २०१५ रोजी अध्यक्षपदी निवड झाली होती. सिरिसेना यांनी श्रीलंकेतील युनायटेड नॅशनल पार्टी (यूएनपी) या प्रमुख विरोधी पक्षाने पाठिंबा दिला होता. यूएनपीचे पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे यांच्याशी सिरिसेना यांचे राजकीय संबंध बिघडले आहेत.

सिरिसेना पुन्हा रिंगणात उतरण्याबाबत संभ्रमआगामी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा लढविणार की नाही हे अद्याप त्यांनी स्पष्ट केलेले नाही. गेल्या वर्षी आॅक्टोबर महिन्यात सिरिसेना यांनी विक्रमसिंघे यांना पंतप्रधानपदावरून हटवून तिथे राजपक्षे यांची वर्णी लावली होती. त्यामुळे त्या देशात सुमारे ५० दिवस घटनात्मक पेचप्रसंग निर्माण झाला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने सिरिसेना यांचा निर्णय घटनाबाह्य ठरवून विक्रमसिंघे यांना पुन्हा पंतप्रधानपदी बसविले.

टॅग्स :Sri Lankaश्रीलंका