शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

Sri Lanka Crisis : “राष्ट्राध्यक्ष कोणीही बनो..,” श्रीलंकेतील नेत्याचं पंतप्रधान मोदींकडे भावूक आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2022 09:26 IST

श्रीलंकेच्या संसदेत ४४ वर्षात पहिल्यांदाच आज (२० जुलै) थेट राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत तिरंगी लढत होत आहे.

श्रीलंकेतील बिघडलेल्या आर्थिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ विरोधी पक्षनेते साजिथ प्रेमदासा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भावनिक आवाहन केले आहे. “श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षपदी कोणीही येवो, माझी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतातील सर्व राजकीय पक्षांना आणि तेथील लोकांना एक नम्र विनंती आहे की या संकटातून बाहेर येण्यासाठी मा लंका आणि तेथील लोकांची मदत करत राहा,” असं प्रेमदासा म्हणाले. त्यांनी ट्वीट करत भारताला हे आवाहन केलं आहे.

श्रीलंकेच्या संसदेत ४४ वर्षात पहिल्यांदाच आज (२० जुलै) थेट राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत तिरंगी लढत होत आहे. हंगामी अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांच्याशिवाय दुल्लास अल्हप्परुमा आणि अनुरा कुमारा दिसानायके हे राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. देश सोडून पळून गेलेल्या गोटाबाया राजपक्षे यांच्या जागी या तिघांपैकी एकाची निवड केली जाईल. निवडणुकीपूर्वी, दुल्लस अल्हप्पारुमा विक्रमसिंघे यांच्यावर आघाडी घेत असल्याचे दिसत आहे. त्यांच्या पक्षातील बहुतांश नेत्यांशिवाय त्यांना विरोधकांचाही पाठिंबा मिळत असल्याचे दिसून येत आहे. याशिवाय श्रीलंकेचे माजी परराष्ट्र मंत्री जीएल पेरीस म्हणाले की, “श्रीलंकेच्या सत्ताधारी पक्ष पोदुजाना पेरामुनाच्या बहुतेक नेत्यांव्यतिरिक्त, विरोधी पक्षाचे नेतेदेखील दुल्लास अल्हप्पारुमा यांना राष्ट्रपती आणि सजिथ प्रेमदासा यांना पंतप्रधान म्हणून पाहू इच्छितात.”

विक्रमसिंघे आघाडीवर?मात्र, ७३ वर्षीय विक्रमसिंघे राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत अजूनही आघाडीवर असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. परंतु २२५ जागांच्या संसदेत बहुमत सिद्ध करणे इतकं सोपं नसेल. श्रीलंकेची आर्थिक परिस्थिती बिकट होण्यापूर्वी ऑगस्ट २०२० ची संसदीय संरचना पाहिली तर १४५ खासदार संख्या असलेल्या एसएलपीपी पक्षातून ५२ खासदार फुटले होते. यानंतर ९३ खासदार राहिले होते. त्यानंतर ४ जण परतले होते. विक्रमसिंघे यांना बहुमतासाठी ११३ खासदारांचं समर्थन आवश्यक आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीSri Lankaश्रीलंकाIndiaभारत