शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

Sri Lanka New President: श्रीलंकेला मिळाले नवे राष्ट्राध्यक्ष; रानिल विक्रमसिंघे यांचा 134 मतांसह मोठा विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2022 13:38 IST

Sri Lanka Crisis: आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या श्रीलंकेला आज अखेर नवीन राष्ट्राध्यक्ष मिळाले आहेत. रानिल विक्रमसिंघे यांची श्रीलंकेच्या संसदेने नवे राष्ट्रपती म्हणून निवड केली आहे.

Sri Lanka New President: आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या श्रीलंकेला (Sri Lanka Crisis) अखेर नवीन राष्ट्राध्यक्ष मिळाले आहेत. रानिल विक्रमसिंघे  (Ranil Wickremesinghe) यांची श्रीलंकेच्या संसदेने नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड केली आहे. राष्ट्राध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर रानिल विक्रमसिंघे यांनी देशाला या कठीण परिस्थितीतून बाहेर काढण्याचा विश्वास व्यक्त केला. 

श्रीलंकेत आज सकाळी 10 वाजल्यापासून नव्या राष्ट्राध्यक्ष निवडीसाठी मतदानाला सुरुवात झाली. अध्यक्षपदासाठी तीन उमेदवारांमध्ये लढत होती. रानिल विक्रमसिंघे, डॅलस आल्हापेरुमा आणि डाव्या पक्षाच्या जनता विमुक्ती पेरामुना (JVP) नेत्या अनुरा कुमारा दिसानायके या तिघांमध्ये थेट लढत होती. बुधवारी झालेल्या निवडणुकीत रानिल विक्रमसिंघे विजयी झाले असून संसदेने त्यांची नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकण्यासाठी उमेदवाराला देशाच्या 225 सदस्यांपैकी 113 पेक्षा जास्त मते मिळणे आवश्यक आहे.

देशात आणीबाणी लागू आहेआर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या श्रीलंकेत गेल्या अनेक दिवसांपासून सरकारविरोधात निदर्शने होत आहेत. या संकटाचा सामना करण्यात श्रीलंका सरकार अपयशी ठरल्यानंतर गोटाबाया राजपक्षेविरोधात लोक रस्त्यावर उतरले. या सर्व गोंधळादरम्यान राजपक्षे देशातून पळून गेले आणि राष्ट्रपतीपदाचाही राजीनामा दिला. यानंतर देशात आणीबाणी लागू करण्यात आली. आज अखेर अनेक दिवसांच्या गोंधळानंतर देशाला नवीन राष्ट्राध्यक्ष मिळाले आहेत.

44 वर्षांत पहिल्यांदाच थेट निवडणुका

गेल्या 44 वर्षात प्रथमच श्रीलंकेच्या संसदेत आज थेट राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका झाल्या. कार्यवाहक अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांच्याशिवाय डॅलस आल्हापेरुमा आणि अनुरा कुमारा दिसानायके निवडणुकीच्या रिंगणात होते. 225 सदस्यीय सभागृहात जादूई आकडा गाठण्यासाठी 113 जणांचा पाठिंबा आवश्यक होता. यासाठी रानिल विक्रमसिंघे यांना आणखी 16 मतांची गरज होती. विक्रमसिंघे यांना तामिळ पक्षाच्या 12 पैकी किमान 9 मतांचा विश्वास होता. परंतू, विक्रमसिंघे यांना 134 मते मिळाली.

का झाली श्रीलंकेची अशी परिस्थिती?परकीय चलनाच्या साठ्यात तीव्र टंचाई झाल्यामुळे अन्नपदार्थ, इंधन आणि औषधे यासारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या आयातीवर वाईट परिणाम झाला आहे. परकीय कर्ज 50 अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या वर गेले आहे. यावर्षी श्रीलंकेला 7 अब्ज अमेरिकन डॉलर्सचे कर्ज फेडायचे आहे. मार्चमध्ये श्रीलंकेतील एका लहान गटाने दूध, नियमित वीजपुरवठा यासारख्या मूलभूत मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले होते, त्यानंतर हा सरकारविरोधातील रोष उफाळून आला.

टॅग्स :Sri Lankaश्रीलंकाElectionनिवडणूकPresidentराष्ट्राध्यक्ष