शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

श्रीलंकादेखील पाकिस्तानच्या मार्गावर! पाकमध्ये गॅस सिलिंडर १०००० रुपये, पगारासाठी कंपन्यांकडे पैसे नाहीत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2023 08:42 IST

पाकिस्तानमध्ये खायला अन्न नाहीय, औषधे नाहीत. बाजारच्या बाजार बंद करावे लागत आहेत. लग्नाचे हॉल बंद ठेवावे लागत आहेत.

भारताच्या शेजारी देशांच्या अर्थव्यवस्था चौपट झाल्या आहेत. चीनची अर्थव्यवस्था देखील मंदीच्या फेऱ्यात अडकत चालली आहे. अशातच भारताच्या विरोधात जाऊन चीनच्या नादी लागलेल्या पाकिस्तान आणि श्रीलंकेची अर्थव्यवस्था आता अखेरच्या घटका मोजू लागली आहे. 

पाकिस्तानमध्ये खायला अन्न नाहीय, औषधे नाहीत. बाजारच्या बाजार बंद करावे लागत आहेत. लग्नाचे हॉल बंद ठेवावे लागत आहेत. या देशात तर एलपीजी गॅस प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून आणावी लागत आहे. श्रीलंकेवर अजून तशी वेळ आलेली नसली तरी हा देश देखील पाकिस्तानच्यात वाटेवर गेल्याने हातच बेकार झाली आहे. 

त्यातलेत्यात श्रीलंकेला भारत मदत तरी करत आहे. श्रीलंका चीनच्या कर्जामध्ये बरबाद झाला आहे. मार्च 2022 पर्यंत पाकिस्तानचे एकूण कर्ज 43 लाख करोड़ पाकिस्तानी रुपये झाले होते. इम्रान खानच्या काळात कर्ज वाढले होते. त्यांनी तीन वर्षांत जनतेवर जवळपास दररोज १४०० कोटी रुपयांचे कर्ज वाढविले. 

पाकिस्तानाच्या परकीय चलनाचा साठा गेल्या महिन्यात $294 दशलक्षने कमी होऊन $5.8 अब्ज झाला आहे. श्रीलंकेत परकीय चलनाचा सतत कमी होत असलेला साठा इतिहासातील सर्वात मोठ्या आर्थिक संकटाचे कारण बनला आहे. पाकिस्तानात गॅस सिलिंडर आता १०००० रुपयांना मिळत आहे. आता 'वर्क फ्रॉम होम पॉलिसी' राबवून सरकारी कार्यालयातील विजेचा वापर कमी केला जात आहे. इलेक्ट्रिक पंख्यांचे उत्पादन जुलै 2023 पर्यंत थांबवण्यात येणार आहे, तर बल्बचे उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणजे काही दिवसांनी याची देखील किल्लत होणार आहे. 

संरक्षण मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, बाजार रात्री 8.30 वाजता बंद होतील, तर विवाह हॉल रात्री 10 वाजता बंद होतील. यामुळे 62 अब्ज रुपयांची बचत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानSri Lankaश्रीलंका