शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

श्रीलंकेत राष्ट्रपतींच्या बेडरुममध्ये आंदोलक घुसले अन् मखमली गादीवर खेळले WWE; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2022 11:42 IST

श्रीलंका आर्थिक दिवाळखोरीचा सामना करत असताना नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे. देशातील महागाईनं हाहाकार केला आहे.

कोलंबो-

श्रीलंका आर्थिक दिवाळखोरीचा सामना करत असताना नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे. देशातील महागाईनं हाहाकार केला आहे. श्रीलंका सरकार नागरिकांच्या रोषाला सामोरं जात असताना आंदोलकांनी आता श्रीलंकेच्या राष्ट्रपती भवनावरही ताबा मिळवला आहे. आंदोलक राष्ट्रपती भवनातील स्विमिंग पूल, किचन आणि लिविंग रुममध्ये धमाल करत असतानाचे व्हिडिओ काल सोशल मीडियातून समोर आले. आता राष्ट्रपतींच्या बेडरुममध्येही आंदोलक मखमली गादीवर उड्या मारतानाचा आणि WWE खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

सोशल मीडियात तुफान व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये आंदोलक नाचताना आणि धुमाकूळ घालताना दिसत आहेत. इतकंच नव्हे, तर राष्ट्रपतींच्या बेडवर मखमली गादीवर चक्क WWE खेळताना दिसत आहेत. WWE मधील समालोचनाचा ऑडिओ जोडून एक व्हिडिओ सध्या ट्विटरवर व्हायरल झाला आहे. यात काही तरुण राष्टपतींच्या बेडरुममधील बेडवर दंगा करताना पाहायला मिळत आहेत. 

आंदोलकांनी राष्ट्रपती भवनातील स्विमिंग पूलचाही आनंद घेतला. स्विमिंग पूलमध्ये आंदोलक मजा करतानाचे व्हिडिओ काल सोशल मीडियात व्हायरल झाले होते. अनेक जण राष्ट्रपती भवनात घुसून बेडवर लोळून सेल्फी टिपताना दिसत आहेत. तसंच राष्ट्रपती भवनातून जे जे काही आपल्याला पळवून नेता येईल ते सर्व काही आंदोलन घेऊन जातानाही दिसत आहे. 

पोलिसांनी आंदोलकांना राष्ट्रपती भवनात प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या आणि पाण्याच्या फवाऱ्याचा वापर केला. पण आंदोलक मोठ्या प्रमाणात असल्यानं गर्दीला रोखण्यात पोलिसांनी यश आलं नाही. श्रीलंकेतील परिस्थिती आता हाताबाहेर गेली आहे.  

टॅग्स :Sri Lankaश्रीलंकाSocial Viralसोशल व्हायरल