शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

Sri Lanka Crisis: राष्ट्रपतींचे अधिकार काढून घेतले! वेगळा झेंडा, मान झुकविणे सारे बंद; श्रीलंकेत बदलाचे वारे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2022 15:30 IST

श्रीलंकेची जनता गेल्या सात दशकांपेक्षाही भयंकर अशा आर्थिक संकटाचा सामना करत आहे. विक्रमसिंघे यांनी राष्ट्रपती पदाचा पदभार हाती घेताच दोन महत्वाचे निर्णय घेतले आहेत.

कोलंबो : गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक संकटात अडकलेल्या श्रीलंकेत बदलाचे वारे सुरु झाले आहेत. राष्ट्रपती पदावर बसलेल्या राजपाक्षे घराण्याने देशाची पुरती वाट लावली आहे. असे असताना आज राजपाक्षेंनी राष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला. त्यांचे भाषण आज सभागृहात वाचून दाखविण्यात आले. यानंतर श्रीलंकेचे पंतप्रधान पदाचा राजीनामा देणारे रानिल विक्रमसिंघे हे पुढील राष्ट्रपती नियुक्त होईस्तोवर कार्यवाहक राष्ट्रपती राहणार आहेत. 

श्रीलंकेची जनता गेल्या सात दशकांपेक्षाही भयंकर अशा आर्थिक संकटाचा सामना करत आहे. विक्रमसिंघे यांनी राष्ट्रपती पदाचा पदभार हाती घेताच दोन महत्वाचे निर्णय घेतले आहेत. याचबरोबर देशात लोकशाही आणि संविधानाच्या संरक्षणाचे आश्वासन दिले आहे. 

श्रीलंकेतही राजेशाहीसारखाच थाट राष्ट्रपतींचा होता. विक्रमसिंघे यांनी सर्वात प्रथम राष्ट्रपतींच्या वेगळ्या झेंड्याची तरतूद रद्द केली आहे. देशाला एकच झेंडा असावा तो देखील राष्ट्राचा झेंडा असे मत त्यांनी मांडले. एका खास टेलिव्हिजन संबोधनात विक्रमसिंघे यांनी मी असे कोणताही असंविधानिक रस्ता निवडणार नाही किंवा अशा कोणत्याही कामासाठी मदत करणार नाही असे म्हटले. याचबरोबर त्यांनी राष्ट्रपतींना म्हटला जाणारा 'महामहिम' हा शब्दही हटविला आहे. यामुळे यापुढे कोणाला राष्ट्रपतींसमोर मान झुकवून उभे रहावे लागणार नाही. याला मनाई करण्यात आली आहे. हे निर्णय तातडीने लागू केले जाणार असल्याचे ते म्हणाले. 

विक्रमसिंघे यांनी देशातील राजकारण्यांना त्यांच्या महत्त्वाकांक्षा बाजूला ठेवण्यास सांगितले आहे. देशात केवळ शांततापूर्ण निदर्शनांना मान्यता दिली जाईल. कोणत्याही संघटनेने हिंसाचार पसरवण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. काही संघटना सैनिकांकडून शस्त्रे हिसकावत असून या हिंसाचारात आतापर्यंत २४ सैनिक जखमी झाले आहेत, असा इशारा त्यांनी दिला. 

टॅग्स :Sri Lankaश्रीलंका