शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
3
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
4
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
5
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
7
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
8
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
9
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

श्रीलंकेत ड्रग्स विरोधात प्रचंड मोठी कारवाई! गेल्या ५० दिवसांत तब्बल ५० हजार जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2024 15:29 IST

'युकथिया' अभियानाअंतर्गत कारवाई, शब्दाला सिंहली भाषेत विशेष अर्थ - काय ते जाणून घ्या

Sri Lanka fights against Drugs: श्रीलंका अनेक वर्षांपासून अंमली पदार्थांच्या व्यापारामुळे हैराण आहे. पण आता तिथल्या सरकारनेच याला सामोरे जाण्याचा निर्णय घेतल्याचे दिसते. या अंतर्गत श्रीलंकासरकारने मोठी कारवाई केली असून, गेल्या ५० दिवसांपासून तेथे एक मोहीम राबवली जात आहे. ‘युकथिया’ असे या मोहिमेचे नाव आहे, ज्याचा सिंहली भाषेतील अर्थ 'न्याय' असा होतो. या मोहिमेअंतर्गत गेल्या ५० दिवसांत ५० हजारांहून अधिक ड्रग्ज विक्रेते आणि गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय लाखो रुपयांचे अंमली पदार्थही जप्त करण्यात आले आहेत. अटक केलेल्या लोकांपैकी ९८ टक्क्यांहून अधिक लोक हे अंमली पदार्थांच्या सेवनाशी संबंधित आहेत. तर ६ हजारांहून अधिक लोक आधीच गुन्हेगारांच्या यादीत होते.

युकथिया मोहीम १७ डिसेंबर रोजी सुरू करण्यात आली. ती संपवण्याची अंतिम मुदत ३० जून निश्चित करण्यात आली आहे. या कारवाईबाबत श्रीलंका पोलीस दररोज तपशीलवार निवेदन जारी करत आहेत. या कारवाईची माहिती जनतेला देण्यासाठी पोलिसांनी हॉटलाइनही तयार केली आहे. आता सरकार या मोहिमेद्वारे देशातून अंमली पदार्थांचा व्यापार संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करत आहे. पण असे असले तरी त्यांना जगभरातून टीकेला सामोरे जावे लागत आहे. समीक्षकांनी हा प्रकार मानवाधिकार उल्लंघनाचा भाग असल्याचे म्हटले आहे.

निषेध करूनही ऑपरेशन सुरूच

युनायटेड नेशन्स ह्युमन राइट्स, लोकल ह्युमन राइट्स कमिशन, लॉयर्स कलेक्टिव्ह इत्यादी इतर अनेक अधिकार गटांकडून निषेध करूनही हे ऑपरेशन सुरूच आहे. या गटांनी असा आरोप केला आहे की श्रीलंका सरकार ड्रग्सच्या धोक्याचा सामना करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य धोरणांचा वापर करू शकले असते परंतु त्याऐवजी ते अमानवी पद्धतीने ही प्रक्रिया हाताळत आहेत. असाही आरोप आहे की 17 डिसेंबरपासून आतापर्यंत अटक करण्यात आलेल्यांपैकी काही आजारी आहेत तरीही त्यांना कोठडीच ठेवून त्यांचा छळ केला जात आहे. अनेक आरोप होऊनही श्रीलंका सरकार सध्या आपल्या भूमिकेवर ठाम आहे.

टॅग्स :Sri Lankaश्रीलंकाDrugsअमली पदार्थArrestअटकPoliceपोलिसGovernmentसरकार