शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आधी केला अदानी समुहासाठी मोदींनी श्रीलंकेवर दबाव टाकणाच्या दावा, आता अधिकाऱ्याचा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 17:27 IST

Adani Project : श्रीलंकेतील ऊर्जा प्रकल्पाचे काम अदानी समुहालाच द्यावे, यासाठी पंतप्रधान मोदी श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांवर मोठा दबाव आणत असल्याचा दावा या अधिकाऱ्याने केला होता.

श्रीलंका मोठ्या आर्थिक संकटात असताना भारत सर्वतोपरी मदत करत आहे. मात्र, श्रीलंकेतील एका अधिकाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर एक मोठा आरोप केला होता. श्रीलंकेतील ऊर्जा प्रकल्पाचे काम अदानी समूहालाच द्यावे, यासाठी पंतप्रधान मोदी श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांवर (President Gotabaya Rajapaksa) मोठा दबाव आणत असल्याचा दावा या अधिकाऱ्याने केला होता. दरम्यान, आता ऊर्जा विभागातील संबंधित अधिकाऱ्यानं आपलं वक्तव्य मागे घेतलं आहे. यानंतर त्यांनी आपल्या पदावरून राजीनामाही दिली आहे. परंतु सरकारनं यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अदानी समूहाला ऊर्जा प्रकल्प देण्यासाठी श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांच्यावर कथितपणे दबाव आणला होता. मात्र या विधानानंतर वाद वाढल्याने एका दिवसानंतर हे विधान संबंधित अधिकाऱ्याने मागे घेतलं. तर दुसरीकडे राजपक्षे यांनी हा आरोप फेटाळून लावला होता. श्रीलंकन अधिकाऱ्याने केलेला आणि नंतर मागे घेतलेला हा दावा देशाच्या उत्तरेला असणाऱ्या मन्नार जिल्ह्यातील ५००-मेगावॅट पवन ऊर्जा प्रकल्पाशी संबंधित आहे. 

समितीपुढे दावाश्रीलंकेच्या सिलोन इलेक्ट्रिसिटी बोर्डाचे अध्यक्ष, एम.एम.सी. फर्डिनांडो यांनी यासंदर्भातील दावा केला होता. फर्डिनांडो यांनी शुक्रवारी कोलंबो येथील संसदीय समितीसमोर हजेरी लावली. राजपक्षे यांच्याशी झालेल्या संभाषणात राष्ट्रपतींनी अदानी समूहाचा प्रकल्प देशात आणण्यासाठी मोदींनी दबाव आणत असल्याचे आपल्याला सांगितल्याचा दावा फर्डिनांडो यांनी केला. राजपक्षे यांनी, मला सांगितले की मी मोदींच्या दबावाखाली आहे. हा प्रकल्प भारतीय कंपनीला देण्यास राष्ट्रपतींनी निर्देश दिल्याचे या वरिष्ठ अधिकाऱ्याने समितीला सांगितले. अदानींना प्रकल्प मिळावा अशी पंतप्रधानांची इच्छा होती, असं राष्ट्रपतींनी आपल्याला सांगितल्याचा दावाही या अधिकाऱ्याने समितीपुढे केला.मागितली माफीराष्ट्राध्यक्ष राजपक्षे यांच्या कार्यालयाने एक निवेदन जारी केल्यानंतर, फर्डिनांडो यांनी श्रीलंकन ​​दैनिक द मॉर्निंगकडे माफी मागितली आणि अनपेक्षित दबाव आणि भावनांमुळे त्यांना भारतीय पंतप्रधानांचे नाव देण्यास भाग पाडलं गेल्याचंही त्यांनी सांगितलं.

टॅग्स :Sri Lankaश्रीलंकाNarendra Modiनरेंद्र मोदीAdaniअदानी