शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीनंतरही किंमत कमी केली नसेल तर मला सांगा, मी तिथे येईल; निर्मला सीतारामन यांचे विधान
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या सकारात्मक भूमिकेचे मोदींकडून स्वागत; म्हणाले, "भारत आणि अमेरिकेमध्ये..."
3
२२ तास चाललेल्या मिरवणुकीनंतर लालबागचा राजा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर दाखल
4
Thane: गणपती विसर्जन करताना पाच जण नदीत बुडाले, एकाचा मृतदेह मिळाला; दोघांचा शोध सुरूच
5
Ganpati Visarjan: भर पावसात, जल्लोषात गणरायाला निरोप; मुंबईत ढोल-ताशांसह गुलालाची उधळण
6
ट्रम्प यांचा यु-टर्न! टॅरिफ पद्धतीत केले बदल; महत्त्वाची खनिजे व औषधी उत्पादनांसह काही वस्तूंना सूट
7
आजचे राशीभविष्य - ७ सप्टेंबर २०२५, नवीन कामाची सुरूवात करण्यास अनुकूल दिवस
8
Aryna Sabalenka : बेलारूसच्या सुंदरीनं घरात घुसून घेतला बदला! सलग दुसऱ्यांदा जिंकली US ओपन स्पर्धा
9
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
10
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
11
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
12
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
13
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
14
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
15
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
16
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
17
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
18
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
19
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
20
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!

विशेष लेख: टेक दिग्गजांच्या सुरक्षेवर कोट्यवधींचा खर्च; विरोधकही मोठ्या प्रमाणावर वाढले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 12:38 IST

अलीकडच्या काळात तंत्रज्ञानानं आपलं आयुष्य आमूलाग्र बदलून टाकलं आहे

अलीकडच्या काळात तंत्रज्ञानानं आपलं आयुष्य आमूलाग्र बदलून टाकलं आहे. येत्या काळात तंत्रज्ञान आणखी काय-काय चमत्कार घडवील हे आपल्या कल्पनेच्याही पलीकडे असेल. त्यामुळेच जगभरातील टेक कंपन्या आणि त्यांचे प्रमुख यांची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे, पण त्याचमुळे त्यांचे विरोधकही मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. याच कारणानं या दिग्गजांच्या सुरक्षेवर आता खूप मोठ्या प्रमाणावर खर्च होत आहे.

मेटा प्रमुख मार्क झकरबर्ग, टेस्ला आणि स्पेसएक्सचे प्रमुख इलॉन मस्क, ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस, ॲमेझॉनचे सध्याचे सीईओ अँडी जॅसी, एनवीडियाचे सहसंस्थापक जेन्सन हुआंग, जेपी मॉर्गनचे चेअरमन आणि सीइओ जेमी डायमोन. ही यातली काही प्रमुख नावं. ही नावं आज घराघरात पोहोचली आहेत. आपल्या कंपन्या आणि उद्योगाच्या बळावर अब्जावधी रुपयांची उलाढाल तर ते करत आहेतच, पण त्याचमुळे केवळ उद्याेजक ही त्यांची प्रतिमा राहिलेली नाही. राजकीय आणि सामाजिक समीकरणांमध्येही महत्त्वाची भूमिका ते बजावत आहेत. त्यामुळे त्यांची सुरक्षा ही केवळ खर्च नाही, तर कंपन्यांच्या रणनीतीचा अविभाज्य भाग झाली आहे. हे धोके आता केवळ व्यावसायिक स्पर्धक किंवा असंतुष्ट कर्मचाऱ्यांकडून नाहीत. डेटाचा गैरवापर, मोठ्या प्रमाणावर नोकरकपात, अब्जावधी डॉलर्सची संपत्ती आणि राजकारणात हस्तक्षेप यामुळे हे दिग्गज सामान्य जनतेच्या रोषाचेही लक्ष्य बनत आहेत.

२०२४ मध्ये १० मोठ्या टेक कंपन्यांनी त्यांच्या सीईओंच्या सुरक्षेवर तब्बल ४५ मिलियन डॉलर्सपेक्षा (सुमारे ३६९ कोटी रुपये) जास्त खर्च केला. यातील सर्वात मोठा वाटा मेटा प्रमुख मार्क झकरबर्ग आणि त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षेवर खर्च झाला आहे.  गेल्या वर्षी ‘मेटा’ने त्यांच्या सुरक्षेवर २७ दशलक्ष डॉलर्स (सुमारे २२१ कोटी रुपये खर्च केले. कॅलिफोर्नियातील पालो अल्टोमधील घराची सुरक्षा आणि प्रवासादरम्यानची सुरक्षा यांचा यात समावेश आहे.

टेस्ला आणि स्पेसएक्सचे प्रमुख इलॉन मस्क यांच्या सुरक्षा खर्चाची पूर्ण माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही, मात्र २०२३ मध्ये टेस्लाने त्यांच्या सुरक्षेसाठी २१ कोटी रुपये खर्च केले होते. मस्क आपल्या सुरक्षेसाठी स्वतःच्याच ‘फाउंडेशन सिक्युरिटी’ या कंपनीची सुरक्षा व्यवस्था वापरतात आणि तब्बल २० बॉडीगार्ड्स सोबत घेऊन ते फिरतात.

इतर टेक दिग्गजांच्या सुरक्षेवरील खर्चही असाच भलामोठा आहे. गेल्या वर्षी जेफ बेझोस यांच्या सुरक्षेवर १३ कोटी रुपये, जेन्सन हुआंग यांच्या सुरक्षेसाठी २९ कोटी रुपये, जेमी डायमोन यांच्या सुरक्षेवर ७.२ कोटी रुपये खर्च करण्यात आले. अँडी जॅसी यांच्यावरील सुरक्षेचं बजेटही मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलं. 

एआय आधारित डीपफेक व्हॉइसने सध्या धोक्याचा नवा टप्पा गाठला आहे. एआय वापरून डीपफेक व्हॉइसद्वारे कंपन्यांकडून बनावट आर्थिक व्यवहार करवून घेण्याचे प्रकार झपाट्यानं वाढले आहेत. त्यामुळे आता सीईओ आणि कंपन्यांच्या डेटाची सुरक्षा ही प्राथमिकता बनली आहे. गेल्या वर्षी युनायटेड हेल्थकेअरचे प्रमुख ब्रायन थॉम्पसन यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. तरीही हल्लेखोराला सोशल मीडियावर मोठा पाठिंबा मिळाला होता.

टॅग्स :World Trendingजगातील घडामोडीtechnologyतंत्रज्ञान