शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

Video: एका लग्नाची भन्नाट गोष्ट! युगुलाने बाल्कनीत आणाभाका घेतल्या, शेजारीही तसेच सहभागी झाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2020 20:55 IST

Corona virus स्पेनमध्ये सरकारने लॉकडाऊन केले आहे. कोरुना शहरातील एका सोसायटीमध्ये अनोखा विवाहसोहळा पार पडला.

कोरुना: वर्षभरापासून लग्नाच्या बेडीत अडकण्याची इच्छा असलेल्या स्पेनच्या युगुलाने कोरोनामुळे अजब तऱ्हेने लग्न केले. आश्चर्याची बाब म्हणजे त्यांच्या शहराचे नाव कोरूना आहे. त्यांनी घराच्या खिडकीमध्ये उभे राहून लग्न केले आहे. या अजब लग्नाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या तरुणाने खिडकीत उभे राहून प्रेयसीसोबत लग्न केले. त्याने त्याच्या सोसायटीमधील एकाला खिडकीत उभे राहून लग्न सोहळ्याचे नेतृत्व करण्यास सांगितले. तसेच दुसऱ्या एका शेजाऱ्याला त्याने साक्षीदार राहण्यास सांगितले. 

कोरुना शहरातील एका सोसायटीमध्ये अनोखा विवाहसोहळा पार पडला. नवरदेव डॅनिअल केमिना आणि नवरी अल्बा डियाज हे आम्ही अखेर लग्न केले, असे किंचाळत असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. विशेष म्हणजे त्यांच्या शेजाऱ्यांनी आपापल्या बाल्कनीमध्ये उभे राहून लग्नसोहळ्याला हजेरी लावली. 

जोडप्याला याच दिवशी लग्न करायचे होते, पण त्यांचे अशा प्रकारे लग्न होईल असे वाटले नव्हते. लग्नाची तारीख लांबवायचीही नव्हती. स्पेनमध्ये कोरोनाचे संक्रमण वाढत आहे. यामुळे लग्न थाटामाटात करायचे नव्हते. कारण असे केल्यास कोनोना पसरण्याची भीती होती. कारण पाहुणेमंडळी येणार मग त्यांच्या स्वागताची व्यवस्था, जेवणाची, बसण्याची व्यवस्था करणे आणि त्यांना कोरोनापासून दूर ठेवणे हे खूप जिकीरीचे होते. यामुळे दोघांनी हा निर्णय घेतला. 

स्पेनमध्ये सरकारने लॉकडाऊन केले आहे. यामुळे घराच्या बाल्कनीमध्ये उभे राहून शेजाऱ्यांच्या उपस्थितीत लग्न करण्याचा निर्णय घेतल्याचे डॅनिअलने सांगितले. शेवटी अल्बाच्या चेहऱ्यावरील आनंद खूप महत्वाचा होता, असे ही डॅनिअल म्हणाला. 

आश्चर्य! चार दिवस रोज फक्त दोन गोळ्या, कोरोनामुक्त झाली महिला डॉक्टर

...अन् पाकिस्तान भीक मागू लागला; म्हणाला 'कर्जमाफी करा'!

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याmarriageलग्न