शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

स्पेनमध्ये लोकांना मिळणार ‘बेसिक इनकम’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 20:47 IST

स्पेनमध्ये विविध पक्ष एकत्र येऊन तयार झालेलं युतीचं सरकार आहे. पण आता त्यांच्यातही याबाबत एकमत झालं असून लोकांना ‘टार्गेटेड बेसिक इनकम’ देण्यात येणार आहे. आत्ताच्या घडीला जगण्यासाठी प्रत्येकाला किमान किती उत्पन्नाची गरज आहे, याचा विचार करून ही रक्कम ठरवण्यात आली आहे. 

ठळक मुद्देस्पेनमध्ये लोकांना जगण्याला मिळाला आधार!

लोकमत न्यूज नेटवर्ककोरोनाच्या संकटातून कसं बाहेर पडायचं, हेच अजूनही अनेक देशांना कळलेलं नाही. इटली, स्पेन, अमेरिका इत्यादि देशांमध्ये तर कोरोनानं इतका हैदोस घातला की त्याला प्रतिकार करणार्‍या सर्व यंत्रणा जवळपास निकामी झाल्या किंवा त्यांना अतिरिक्त क्षमतेनं काम करावं लागतंय. तरीही कोरोना आटोक्यात येण्याची कोणतीही शक्यता दिसत नाही. त्यामुळेच अनेक देश आता अक्षरश: घाबरले आहेत. पोलीस आणि आरोग्य व्यवस्थेतील लोकांकडून किती काम करवून घ्यायचं, त्यांना दिवसाचे किती तास दावणीला बांधून ठेवायचं, आणि त्यांचे जीव किती धोक्यात घालायचे यालाही र्मयादा आहेत. ही झाली प्रशासनातली प्रमुख ‘कार्यकर्त्यांची’ कहाणी, पण सर्वसामान्य माणसांचे काय?आपल्या आयुष्याचाच भरवसा अनेक देशांतील नागरिकांना आता वाटत नाहीए. त्यावर उपाय शोधण्याचे प्रय} वैयक्तिक आणि सरकारी पातळीवर सुरू आहेत, पण हे कोणतेही प्रयत्न पुरे पडणारे नाहीत. अनेक प्रगत देशांतही अनेक नागरिकांवर भूकबळी होण्याची वेळ आली आहे. प्रत्येक जण आहे ते टिकवून ठेवण्याचा आणि समजा एक पोळी असेल तर त्यातलीही चतकोरच खाऊन पाऊण पोळी येणार्‍या दिवसांसाठी राखून ठेवण्याचा प्रय} करतो आहे. स्पेनमध्येही हीच परिस्थिती आहे. हजारो लोकांना कोरोनाबरोबरच आपल्या भुकेचीही चिंता आहे. या दोघांपैकी कोणीतरी आपल्याला मारेलच, या भीतीची काजळी त्यांच्या डोक्यावर धरलेली आहे. सरकारनंही त्यासाठी गांभीर्यानं प्रय} सुरू केले आहेत. लोकांना किमान जिवंत राहण्याइतकं तरी अन्न मिळावं, त्यासाठीचा पैसा त्यांना मिळावा यासाठी त्यांनी प्रय} सुरू केले आहेत.स्पेनमध्ये विविध पक्ष एकत्र येऊन तयार झालेलं युतीचं सरकार आहे. पण आता त्यांच्यातही याबाबत एकमत झालं असून लोकांना ‘टार्गेटेड बेसिक इनकम’ देण्यात येणार आहे. आत्ताच्या घडीला जगण्यासाठी प्रत्येकाला किमान किती उत्पन्नाची गरज आहे, याचा विचार करून ही रक्कम ठरवण्यात आली आहे. यासंदर्भात डाव्या पक्षांचे सेक्रेटरी जनरल पाब्लो इग्लेसियास यांनी आपल्या ट्विटर हॅँडलवरुन नुकतेच निवेदन दिले आहे की, ‘बेसिक इनकम’ हे केवळ तुमच्या सामाजिक न्यायाच्या मोजमापाचे मापदंड नसते, तर तुमच्या आर्थिक कार्यक्षमतेचेही ते प्रतीक असते. आम्हाला आनंद आहे, की आमच्या युती सरकारमधील सर्वांमध्ये आता सहमती झाली असून येत्या मे महिन्यापासून आम्ही लोकांना ‘मिनिमम बेसिक इनकम’ देऊ शकू!स्पेनमध्ये सध्याच्या घडीला अशी हजारो कुटुंबं आहेत, ज्यांना आजच्या जेवणाचीच भ्रांत पडली आहे. आणखी जास्त काळ ते तग धरू शकणार नाहीत. सरकारनंही मग यासाठी शक्य त्या सार्‍या उपाययोजना करताना निदान मे महिन्यापासून तरी लोकांना किमान रक्कम मिळेल अशी तजवीज केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या